Rain Alert Agrowon
हवामान

Rain Alert Maharashtra : कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा अंदाज

Weather Forecast : विदर्भात तापमान चाळिशीपार आहे. आज (ता. ९) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

अमोल कुटे

Pune News : महाराष्ट्रात पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळत असल्या तरी, उन्हाचा चटका आणि उकाडा वाढला आहे. विदर्भात तापमान चाळिशीपार आहे. आज (ता. ९) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

‎पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे महाराष्ट्राच्या मध्य भागात हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. विदर्भात कमाल तापमान वाढल्याने पारा चाळीशीपार गेला आहे. रविवारी (ता. ८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी ४१.६ अंश तापमानाची नोंद झाली. नागपूर, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ येथे पारा चाळिशीपार होता.

कोकण, मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी कोसळत आहेत. आज (ता. ९) राज्यात विजासंह पावसाचा अंदाज कायम आहे. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, मराठवाड्यातील बीड, धाराशिव, लातूर, नांदेड जिल्ह्यात विजासंह वादळी पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. विदर्भात मुख्यतः कोरड्या हवामानसह हलक्या पावसाची शक्यता आहे.

‎मॉन्सूनची सीमा कायम

‎नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांची महाराष्ट्रातील मुंबईसह अहिल्यानगर, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याच्या काही भागात २६ मेपर्यंत मजल मारली. बंगालच्या उपसागरातून देखील २९ मेपर्यंत मॉन्सूनची चाल सुरू होती, त्यानंतर मात्र मॉन्सूनचे प्रवाह मंदवल्याने रविवारी (ता. ८) मॉन्सूनची वाटचालीची सीमा कायम होती.

‎रविवारी (ता. ८) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

‎ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

‎पुणे---२९.२---२२.६

‎धुळे---३९.०---२३.६

‎जळगाव---३९.६---२६.४

‎जेऊर---३२.०---२१.०

‎कोल्हापूर---३१.१---२२.८

‎महाबळेश्वर---२१.२---१७.६

‎मालेगाव---३६.८---२२.८

‎नाशिक---३२.२---२४.०

‎निफाड---३४.२---२३.६

‎सांगली---३१.१---२२.४

‎सातारा---२८.४---२२.०

‎सोलापूर---३४.५---२५.१

‎सांताक्रूझ---३१.८---२५.४

‎डहाणू---३४.२---२५.९

‎रत्नागिरी---३१.१---२४.८

‎छत्रपती संभाजीनगर---३७.४---२४.४

‎धाराशिव---३३.१---२०.७

‎परभणी---३७.०---२४.५

‎परभणी (कृषी)---३७.६---२३.८

‎अकोला---४०.१---२८.६

‎अमरावती---३६.८---२६.५

‎भंडारा---३९.०---२७.०

‎बुलडाणा---३६.५---२५.०

‎ब्रह्मपुरी---४१.२---२७.५

‎चंद्रपूर---४१.६---२६.६

‎गडचिरोली---४१.०---२६.६

‎गोंदिया---३८.२---२६.६

‎नागपूर---३९.५---२८.४

‎वर्धा---३८.०---२८.६

‎वाशीम---३८.०---२५.२

‎यवतमाळ---३९.२---२७.८

‎‎विजांसह वादळी पावसाची शक्यता (येलो अलर्ट) :

‎रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought Crisis: होरपळीच्या सुलतानी झळा

Onion Procurement Irregularities: ‘खरे’ उत्तर मिळेल?

Water Shortage Management: पुणे जिल्ह्यात टंचाईमुळे पाणी नियोजनाला वेग

Marathwada Climate Monitoring: मराठवाड्यात हवामान अभ्यास, संशोधन केंद्राची गरज

Agricultural Pump Theft: दुष्काळात तेरावा महिना; कृषिपंपांसह केबलची चोरी

SCROLL FOR NEXT