Rain News Agrowon
हवामान

Marathwada Rain Update : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत पावसाची हजेरी

Rain News : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ६५ पैकी ६३ मंडलांत पावसाचे हजेरी लागली. जिल्ह्यातील ढोरकीन मंडलात ८०.८ मिलिमीटर, तर बिडकीन मंडलात ६९ मिलिमीटर इतक्या अतिवृष्टीची नोंद झाली.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar Rain News : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव या पाच जिल्ह्यांत अनेक मंडलांत तुरळक, हलका, मध्यम ते दमदार पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जालना, बीड व लातूरमधील प्रत्येकी एका मंडलांत अतिवृष्टी झाली.

प्रतीक्षेत असलेला पाऊस आता सक्रिय होण्याची चिन्हे दिसत असल्याने शेतकरी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण आहे. शिवाय पेरणीची लगबगही वाढली आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ६५ पैकी ६३ मंडलांत पावसाचे हजेरी लागली. जिल्ह्यातील ढोरकीन मंडलात ८०.८ मिलिमीटर, तर बिडकीन मंडलात ६९ मिलिमीटर इतक्या अतिवृष्टीची नोंद झाली. जिल्ह्यातील पैठण तालुक्यात सरासरी ३६, तर गंगापूर तालुक्यात सरासरी २१.८ मिलिमीटर पाऊस झाला.

जालना जिल्ह्यातील ४६ मंडलांत पावसाची तुरळक, हलकी, मध्यम, दमदार हजेरी लागली. जिल्ह्यातील अंतरवली मंडलात ७१.५ मिलिमीटर इतक्या अतिवृष्टीची नोंद झाली. जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात सरासरी ३१.६ मिलिमीटर, बदनापूर तालुक्यात सरासरी २३.६ मिलिमीटर, अंबड तालुक्यात सरासरी ३१.७ मिलिमीटर इतका पाऊस झाला.

बीड जिल्ह्यातील दावलावडगाव या मंडलात ७० मिलिमीटर इतक्या अतिवृष्टीची नोंद झाली. जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात सरासरी २२.५ मिलिमीटर तर केज तालुक्यात सरासरी ३३.२ मिलिमीटर पाऊस झाला. नांदूरघाट मंडलात ४८.८ मिलिमीटर, हनुमंत पिंपरी मंडलात ५४.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. इतर मंडलात तुरळक, हलका, मध्यम पाऊस झाला.

लातूर जिल्ह्यातील ६० मंडलात पावसाची हजेरी लागली. अंधोरी मंडलात ६५.८ मिलिमीटर इतक्या अतिवृष्टीची नोंद झाली.

जिल्ह्यातील शिरूर अनंतमाळ तालुक्यात सरासरी ३७.१ मिलिमीटर, देवनी ३७.८ मिलिमीटर, चाकूर २८.९ मिलिमीटर, उदगीर ३४.७ मिलिमीटर, निलंगा २४.८ मिलिमीटर तर अहमदपूर तालुक्यात सरासरी २१.२ मिलिमीटर पावसाची हजेरी लागली.

धाराशिव जिल्ह्यातील ३६ मंडलात पावसाची तुरळक, हलकी ते मध्यम हजेरी लागली. जिल्ह्यातील नारंगवाडी मंडलात ४३.८ मिलिमीटर, कळंब ३१.८ मिलिमीटर, वनाळा मंडलात ३७.३ मिलिमीटर, तर जळकोट मंडलात २९.८५ मिलिमीटर पाऊस झाला. या पावसाने शेतकऱ्यांची बियाणे खते खरेदीसाठी लगबग वाढली असून शिवारातही शेतकऱ्यांनी पेरणीच्या तयारीला प्राधान्य दिले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Relief : दुष्काळी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करा; जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांचे कडक निर्देश

Marathwada Agriculture Crisis : पाण्यासाठी बळीराजा चिंतेत; बीड, जालना आणि संभाजीनगर जिल्ह्यात रब्बी पेरण्या थंडावल्या

Plowman's Folly: प्लोमॅन्स फॉली : विना नांगरणी शेतीतील प्रयोगांचे सार

Solapur DCC Bank Election: सोलापूर जिल्हा बँक निवडणुकीचा बिगूल अखेर वाजला; आठ वर्षांनंतर निवडणूक प्रक्रियेला सुरुवात

Ahilyanagar District Bank Election: अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणुकीत महिला मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष; दोन जागांसाठी सात उमेदवार

SCROLL FOR NEXT