Rain Alert Agrowon
हवामान

Maharashtra Rain Alert : कोकण, घाटमाथा आणि विदर्भात जोरदार पावसाची शक्यता

अमोल कुटे

Pune News : आठवड्याच्या सुरुवातीला दमदार हजेरी लावल्यानंतर सध्या पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे. रविवारी (ता. २८) कोकण, मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा आणि पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

पश्चिम बंगाल आणि उत्तर ओडिशा परिसरावरील कमी दाब क्षेत्र सक्रिय असून, त्याला लागूनच समुद्र सपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. ही प्रणाली वायव्येकडे सरकण्याची शक्यता आहे.

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या गंगानगरपासून, सिकार, ग्वालियर, सिधी कमी दाबाचे केंद्र ते उत्तर बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारला आहे. दक्षिण गुजरातपासून ते उत्तर केरळ किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून, महाराष्ट्राच्या दक्षिण भागात पूर्व-पश्चिम वाहणाऱ्या परस्पर विरोधी वाऱ्यांचे जोड क्षेत्र सक्रिय आहे.

कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी, पावसाची संततधार सुरूच होती. अनेक ठिकाणी १०० मिलीमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. शनिवारी (ता. २७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर अतिवृष्टीची झाली.

महाबळेश्वर आणि कोयना (नवजा) येथे उच्चांकी १७० मिलीमीटर पाऊस झाला. घाटमाथ्यावर काही ठिकाणी १०० मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस पडला. विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असली, तरी उर्वरित राज्यात पावसाने उसंत घेतल्याचे दिसून आले.

आज (ता. २८) कोकणातील रायगड आणि सातारा जिल्ह्याचा घाटमाथ्याकडील भागात जोरदार पावसाचा 'ऑरेंज' अलर्ट आहे. तर पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा 'येलो' अलर्ट आहे. विदर्भात विजांसह पावसाची शक्यता आहे, तर उर्वरित राज्यात ढगाळ आकाशासह पावसाच्या हलक्या सरींची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :

रायगड, सातारा.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर.

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Cotton Madat : पहिल्या टप्प्यात ४६ लाख शेतकऱ्यांचं सोयाबीन, कापूस अनुदान जमा होण्याची शक्यता

Soybean Subsidy : सोयाबीन अनुदानासाठी आधार संमती पत्र भरून द्या; कृषी सहाय्यकांचं शेतकऱ्यांना आवाहन

Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने कायदा, सुव्यवस्थेचा आढावा

Groundnut Harvesting : बोरपाडळे परिसरात भुईमूग काढणी सुरू

Weather Update : नक्षत्र बदलले; वातावरणात वाढला उन्हाचा चटका

SCROLL FOR NEXT