Weekly Weather Update  Agrowon
हवामान

Weather Update : दक्षिण कोकणात मुसळधारेचा ऑरेंज अलर्ट

Monsoon Rain : मॉन्सून दाखल झाल्यानंतर राज्याच्या अनेक भागांत पावसाने दडी मारल्याचे चित्र आहे.

अमोल कुटे

Pune News : मॉन्सून दाखल झाल्यानंतर राज्याच्या अनेक भागांत पावसाने दडी मारल्याचे चित्र आहे. पावसात पडलेल्या खंडामुळे डोळे आकाशाकडे लागले असून, राज्यात सर्वदूर जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.

अरबी समुद्रावरून मॉन्सून बळकट होत असल्याने आज (ता. २६) दक्षिण कोकणात मुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) आहे. उर्वरित कोकण, घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा, तर विदर्भात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

मंगळवारी (ता. २५) सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोकणात पावसाचा जोर ओसरल्याचे दिसून आले. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी हलका ते जोरदार पाऊस पडला. उर्वरित राज्यात जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. दरम्यान अरबी समुद्रातून मॉन्सून सक्रिय होण्याची चिन्हे आहेत.

अरबी समुद्रावरून मॉन्सूनचे प्रवाह बळकट होऊ लागल्याने किनाऱ्यालगत मोठ्या प्रमाणावर बाष्प जमा झाले आहे. कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढण्याचे संकेत आहेत. तर राज्याच्या अंतर्गत भागात मात्र पावसासाठी काही दिवस वाट पहावी लागणार आहे.

मध्य गुजरात आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. त्यापासून बिहारपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. मध्य प्रदेशावर चक्राकार वारे वाहत आहेत. महाराष्ट्र ते केरळ किनाऱ्याला लागून हवेचा दक्षिणोत्तर कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. पावसाळी वातावरणामुळे कमाल तापमानात घट झाली असली, तरी उन्हाचा चटका आणि उकाडा मात्र कायम आहे.

मॉन्सूनची उत्तरेकडे चाल

महाराष्ट्र व्यापल्यानंतर मॉन्सूनने उत्तरेकडे चाल केली आहे. मंगळवारी (ता. २५) उत्तर अरबी समुद्र, गुजरात, मध्य प्रदेशचा आणखी काही भाग, पश्चिम उत्तर प्रदेशाचा तसेच राजस्थानच्या काही भागात मॉन्सूनने प्रगती केली आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत उत्तरेकडील आणखी काही भागात मॉन्सून दाखल होण्यास पोषक हवामान होत आहे.

मंगळवारी (ता. २५) सकाळपर्यंतच्या २४ तासांत पडलेला पाऊस (मिमी) :

कोकण : पालघर : जव्हार २५, रायगड : माथेरान ३०, सुधागडपाली २७, रत्नागिरी : गुहागर ३४, खेड २७, लांजा ५८, राजापूर ५०, रत्नागिरी ३८, संगमेश्वर ३४. सिंधुदुर्ग : आवळेगाव ६१, कणकवली ४३, कुडाळ ५९, मालवण ४६, मुलदे (कृषी) ६७, सावंतवाडी ४७, वेंगुर्ला ५०.

मध्य महाराष्ट्र : नगर : कोपरगाव २०, पारनेर ३९, जळगाव : चाळीसगाव ५८, कोल्हापूर : चंदगड २७, गगनबावडा २३, शाहूवाडी ३३, नाशिक : देवळा ६५, कळवण २०, सटाणा २९, वणी ५८, येवला २६, पुणे : दौंड २०.

मराठवाडा : छत्रपती संभाजीनगर : कन्नड २५.

विदर्भ : बुलडाणा : बुलडाणा २१. यवतमाळ : दारव्हा २१, नेर ३३.

जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :

रत्नागिरी, सिंधुदुर्ग.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

ठाणे, मुंबई, रायगड, पुणे, सातारा, कोल्हापूर.

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, वर्धा, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Jackfruit Farming : कोकणात प्रक्रियेतून फणसाला मिळतेय नवी झळाळी

AI In Sugar cane: ऊस लागवडीत ‘एआय’ तंत्र वापरणार

Local Self Government : स्थानिक स्वराज्य संस्थांचे बळकटीकरण

Warehouse Receipt: पूर्व युरोप, मध्य आशिया खंडातील गोदाम पावती वित्तपुरवठा

Agriculture Development: दिशा कोरडवाहू शेती विकासाची!

SCROLL FOR NEXT