Monsoon Agrowon
हवामान

Monsoon Rain : माॅन्सूनची आज मोठी झेप; माॅन्सून पुढील २ दिवसांमध्ये देशाच्या आणखी काही भागात चाल करणार

Weather Update : माॅन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान असून पुढील २ दिवसांमध्ये आणखी काही भागात दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

Anil Jadhao 

Pune News : माॅन्सून वेळेच्या आधीच केरळमध्ये प्रवेश करत सुखद धक्का दिला. तर माॅन्सून केवळ केरळमध्येच नाही तर ईशान्य भारताच्या ७ राज्यांमध्येही पोचला. तसेच माॅन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान असून पुढील २ दिवसांमध्ये आणखी काही भागात दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला. 

माॅन्सूनने आज केरळ आणि ईशान्य भारतात प्रवेश केला. माॅन्सूनने केरळचा बहुतांशी भाग आज व्यापला. तर तमिळनाडूच्या काही भागातही माॅन्सन दाखल झाला. तसेच ईशान्य भारतातील संपूर्ण नागालॅंड, संपूर्ण मनिपूर, संपूर्ण मिझोराम, संपूर्ण अरूणाचल प्रदेश व्यापले. तर त्रिपुरा, मेघालय आणि आसामच्या काही भागात माॅन्सूनने चाल केली. 

माॅन्सूनने आज अरबी समुद्राचा बहुतांशी भाग, मालदीव आणि कोमोरिनचा उर्वरित भाग, ईशान्य बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग माॅन्सूनने व्यापला. माॅन्सूनची सिमा अमिनी, कन्नूर, कोईम्बतूर, कन्याकुमारी, अगरताळा आणि धुब्री भागात आहे.

तसेच माॅन्सूनच्या प्रगतीसाठी पोषक हवामान आहे. त्यामुळे पुढील २ ते ३ दिवसांमध्ये माॅन्सून केरळ आणि लक्षद्वीपचा आणखी काही भाग, तमिळनाडूचा आणखी काही भाग, आसाम आणि मेघालय आणि पश्चिम बंगाल, सिक्कीमचा आणखी काही भाग तसेच अरबी समुद्राचा आणखी काही भाग आणि बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात माॅन्सून दाखल होईल, असा अंदाजही हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nashik Mahavitaran : सिद्ध पिंपरीत महावितरण विरोधात धडक मोर्चा

Ujani Bridge: उजनीत साकारतोय विकासाचा सेतू!

Nashik Rain: नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला

Fake Seed Complaints: नागपूर विभागात बोगस बियाण्यांच्या ३९४ तक्रारी

Yavatmal Farmers: यवतमाळमध्ये प्रीमियम वाढीने पीकविम्याकडे शेतकऱ्यांची पाठ

SCROLL FOR NEXT