Monsoon Agrowon
हवामान

Monsoon 2025: माॅन्सून मंगळवारपर्यंत महाराष्ट्रात येणार; गोव्याच्या उंबरठ्यापर्यंत माॅन्सूनची मजल

Monsoon Maharashtra Update: माॅन्सून अंदाजित वेळेच्या एक दिवस आधी आणि सरासरी वेळेच्या ८ दिवस आधी आज (ता.२४) केरळमध्ये धडक दिली.

Anil Jadhao 

Pune News: माॅन्सून अंदाजित वेळेच्या एक दिवस आधी आणि सरासरी वेळेच्या ८ दिवस आधी आज (ता.२४) केरळमध्ये धडक दिली. माॅन्सूनने देशात मोठी झेप घेत संपूर्ण केरळ आणि तमिळनाडूचा बहुतांशी भाग व्यापून कर्नाटकाच्या काही भागापर्यंत मजल मारली. माॅन्सून आज गोव्याच्या उंबरठ्यावर आला. तर पुढील २ ते ३ दिवसांत माॅन्सून महाराष्ट्रात दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला. 

माॅन्सूनने दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर माॅन्सूनने आज मोठी झेप घेतली. आज संपूर्ण केरळ राज्य माॅन्सूनने व्यापले. तसेच तमिळनाडू राज्याचा बहुतांशी भागातही माॅन्सून दाखल झाला. कर्नाटकाचाही काही भाग माॅन्सूनने व्यापला. सोबतच दक्षिण अरबी समुद्राचा संपूर्ण भाग, संपूर्ण लक्षद्वीप बेटे, पूर्व मध्य बंगालाच्या उपसागराचा संपूर्ण भाग, उत्तर बंगालच्या उपसागराचा काही भाग तर मिझोरामच्या काही भागात माॅन्सून एक दिवस आधीच दाखल झाला. 

माॅन्सूनच्या वाटचालीचा सिमा आज कर्नाटकातील करवार आणि सिमोगा, तमिळनाडूतील धर्मापुरी आणि चेन्नई, तसेच मिझोराममधील सैहा भागात होती. माॅन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान आहे. 

माॅन्सून पुढील २ ते ३ दिवसांत माॅन्सून संपूर्ण गोवा व्यापून महाराष्ट्रात दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला. तसेच माॅन्सून पुढील २ ते ३ दिवसांमध्ये आंध्र प्रदेशातही दाखल होईल. कर्नाटकचा काही भाग, तमिळनाडूचा उरलेला भाग, ईशान्येकडील राज्यांचा काही भाग, हिमालयाकडील पश्चिम बंगालचा भाग आणि सिक्कीमच्या काही भागातही माॅन्सून दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला. शिवाय या काळात माॅन्सून मध्य अरबी समुद्राचा काही भाग, बंगालच्या उपसागराचा आणखी काही भागातही दाखल होईल, असा अंदाज आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fodder Management: कमी पावसाच्या स्थितीत चाऱ्याचे आत्तापासून करा नियोजन

Gharkul Yojana : सोलापुरात ३ हजारांहून अधिक घरकुल लाभार्थींना ७२२२ ब्रास वाळूचे वाटप

Weed Removal Begins: भात, नाचणी पिकांत तण काढणी सुरू

Sugarcane Dues : जिल्ह्यात ३३७ कोटींची ऊसबिले अद्यापही थकीत

Ravikant Tupkar: रविकांत तुपकरांना पोलिसांची नोटीस; पण आंदोलनावर ठाम

SCROLL FOR NEXT