Monsoon Agrowon
हवामान

Monsoon Progress: माॅन्सूनचा मुक्काम; मध्य महाराष्ट्र, कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

Rain Update: माॅन्सूनने कालपासून एकाच जागेवर मुक्काम केला. तरीही माॅन्सून रविवारपर्यंत केरळमध्ये पोचेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

Anil Jadhao 

Pune News: माॅन्सूनने कालपासून एकाच जागेवर मुक्काम केला. तरीही माॅन्सून रविवारपर्यंत केरळमध्ये पोचेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. तसेच मध्य महाराष्ट्र आणि कोकणात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा रेड अलर्टही देण्यात आला. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस दणका देण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

माॅन्सूनने आज प्रगती केली नाही. माॅन्सूनने आज त्याच भागात मुक्कम केला. मात्र माॅन्सूनच्या प्रगतीसाठी पोषक हवामान आहे. त्यामुळे पुढील २ ते ३ दिवसांमध्ये माॅन्सून मोठी चाल करण्याची शक्यता आहे. माॅन्सून रविवारपर्यंत केरळ गाठेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

माॅन्सून पुढील २ ते ३ दिवसांमध्ये दक्षिण अरबी समुद्राच्या आणखी काही भागात प्रगती करेल. मालदीव आणि कोमोरिनचा उरलेला भागही व्यापेल आणि लक्षद्वीप, केरळ, तमिळनाडू आणि ईशान्यकडील राज्यांमध्ये काही भागातही माॅन्सून दाखल होईल. बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग माॅन्सून पुढील २ ते ३ दिवसांमध्ये व्यापेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

पूर्व-मध्य अरबी समुद्रात कोकण आणि गोवा किनारपट्टीवर कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. पुढील ३६ तासात ही प्रणाली उत्तरेकडे सरकरण्याची शक्यता असून त्याची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यानंतर या कमी दाब क्षेत्राची तीव्रता जास्त वाढण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

राज्यातील अनेक भागात पावसाला पोषक हवामान आहे. त्यातही मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही ठिकाणी पावसचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने आज सातारा जिल्ह्यातील घाट परिसर, रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात उद्याही रेड अलर्ट जारी करण्यात आला.

ठाणे, रायगड, सिंधुदूर्ग, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, परभणी, बीड, नांदेड आणि लातूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला. तसेच विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पुढील ५ दिवस काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज देण्यात आला. मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज पुढील ५ दिवस आहे.

मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर काहीसा अधिक राहण्याची शक्यता आहे. कोकणातील जिल्ह्यांना जोरदार वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला. तर मध्य महाराष्ट्रातील सातारा, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, अहिल्यानगर या जिल्ह्यांतही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पुढील ५ दिवस पावसाला पोषक हवामान आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Massive Agricultural Crisis : बळीराजा उद्ध्वस्त! ८ लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

Satara Rabi Season : सातारा जिल्ह्यात 'रब्बी'ची केवळ ५ टक्केच पेरणी पूर्ण; पाऊस गायब झाल्याने बळीराजा संकटात!

Nar-Par Girna Project : नार-पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाला तीव्र विरोध; जमिनी आणि पाणी वाचवण्यासाठी शेतकरी एकवटले!

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

SCROLL FOR NEXT