Monsoon Update  Agrowon
हवामान

Monsoon Update : कर्नाटकमध्ये आज मॉन्सूनची प्रगती शक्य

Team Agrowon

Weather Update Pune : अरबी समुद्रातील ‘बिपॉरजॉय’ चक्रीवादळाची तीव्रता कायम आहे. ही वादळी प्रणाली हळूहळू उत्तरेकडे सरकत असल्याने मॉन्सूनच्या प्रगतीस पोषक हवामान होत आहे. आज (ता. १०) कर्नाटकच्या काही भागासह अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि ईशान्य भारतातील राज्यांमध्ये नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांची (मॉन्सून)प्रगती होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

अरबी समुद्रात मंगळवारी (ता. ६) ‘बिपॉरजॉय’ चक्रीवादळाची निर्मिती झाली. हे चक्रीवादळ अतितीव्र झाले आहे. शुक्रवारी (ता. ९) ही प्रणाली गोव्यापासून ८०० किलोमीटर पश्चिमेकडे, मुंबईपासून ८२० किलोमीटर नैर्ऋत्येकडे तर गुजरातच्या पोरबंदरपासून ८३० किलोमीटर दक्षिणेकडे होती. उद्यापर्यंत ही प्रणाली ईशान्य दिशेकडे येईल. नंतर वायव्येकडे वळण्याची शक्यता आहे.

किनाऱ्याला समांतर दिशेने जाणाऱ्या या चक्रीवादळामुळे ताशी १४५ ते १७० किलोमीटर वेगाने वारे वाहतील. अरबी समुद्र खवळून उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे. तसेच आजपासून महाराष्ट्राच्या किनारपट्टीलगत ताशी ४० ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा इशारा आहे.

तसेच किनारपट्टीवर हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. समुद्रात मासेमारीसाठी न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बंगालच्या उपसागरात, म्यानमार किनाऱ्यावर कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली असून, या प्रणालीची तीव्रता वाढेल.

उद्या ईशान्य भारत व्यापण्याचे संकेत

मॉन्सूनची शुक्रवारी (ता. ९) प्रगती झाली नाही. वाऱ्यांच्या प्रगतीस पोषक हवामान असल्याने आज (ता. १०) मॉन्सून प्रगती करण्याची शक्यता आहे. तर उद्या (ता. ११) संपूर्ण ईशान्य भारत व्यापून, पश्चिम बंगालचा हिमालयाकडील भाग आणि सिक्कीम राज्यात मॉन्सून प्रगती करण्याचे संकेत आहेत.

पूर्वमोसमी पावसाची शक्यता

कमाल तापमानात वाढ झाल्याने विदर्भ अक्षरशः तापला आहे. उर्वरित राज्यातही उन्हाच्या झळा असह्य होत आहेत. पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान असल्याने, आज (ता. १०) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विजा मेघगर्जनेसह, वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

विभागनिहाय पावसाचा अंदाज

कोकण : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.

मध्य महाराष्ट्र : जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर.

मराठवाडा : छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, धाराशिव, लातूर.

विदर्भ : अमरावती, वाशीम, यवतमाळ, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Upsa Irrigation Scheme : परभणी, मानवत तालुक्यांत उपसा सिंचन योजना प्रस्तावित

Bullet Train : बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सुसाट

Crop Loan : पीककर्ज वाटपप्रकरणी दाखल गुन्हे मागे घ्या

Panchganga Sugar Factory : पंचगंगा साखर कारखान्याच्या वार्षिक सभेला गालबोट, कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी

Electricity Bill Waive : कोल्हापुरातील पाणी संस्थांना वीजबिल माफीची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT