Monsoon Agrowon
हवामान

Monsoon 2025: माॅन्सूनची श्रीलंकेत चाल; महाराष्ट्रात ५ दिवस वादळी पाऊस; माॅन्सूनचा इशारा

Rain Forecast: माॅन्सूनने आज श्रीलंकेचा बहुतांशी भाग व्यापला. माॅन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान कायम असून पुढील ३ दिवसांत माॅन्सून आणखी काही भाग व्यापेल.

Anil Jadhao 

Pune News: माॅन्सूनने आज श्रीलंकेचा बहुतांशी भाग व्यापला. माॅन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान कायम असून पुढील ३ दिवसांत माॅन्सून आणखी काही भाग व्यापेल. तसेच कर्नाटकच्या किनारपट्टीलगत बुधवारी चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. राज्यात पढील ५ दिवस वादळी पावसाचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला.

माॅन्सूनने आज अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि श्रीलंकेच्या काही भागात प्रगती केली. माॅन्सूनने आतापर्यंत श्रीलंकेचा बहुतांशी भाग व्यापला. तसेच दक्षिण अरबी समुद्राच्या आणखी काही भागात चाल केली. मालदीव आणि कोमोरिनच्या काही भागात माॅन्सून पुढे सरकला. तसेच बंगालच्या उपसागराच्या काही भागातही माॅन्सूनने प्रगती केली.

माॅन्सूच्या वाटचालीसाठी पोषक हवामान आहे. त्यामुळे पुढील २ ते ३ दिवसांत माॅन्सून दक्षिण अरबी समुद्राचा आणखी काही भाग, मालदीव आणि कोमोरिनचा उरलेला भाग आणि बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग व्यापण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

तसेच पूर्व-मध्य अरबी समुद्रात कर्नाटकच्या किनाऱ्यालगत बुधवारी चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार होण्याची शक्यता आहे. या वाऱ्यांच्या प्रभावामुळे गुरुवारी या भागात कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचे संकेत आहेत. त्यानंतर ही स्थिती उत्तरेकडे सरकताना तीव्रता वाढण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

राज्यातील काही भागात पुढील ५ दिवस पावसाचा अंदाज देण्यात आला. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पुढील ३ दिवस पावसाची शक्यता आहे. नागपूर, अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशीम, यवमाळ, वर्धा, भंडारा, गोंदीया, गडचिरोली आणि चंद्रूपर जिल्ह्यातील काही भागात विजा आणि ढगांच्या गडगडाटासह वादळी पावसाचा अंदाज आहे.

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, लातूर, धाराशीव आणि बीड जिल्ह्यात पुढील ५ दिवस काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. खानदेशातील जळगाव, धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यातही पावसाची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, अहिल्यानगर, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातही काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज आहे. पुढील ५ दिवस या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यातही काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज देण्यात आला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT