Monsoon Update 2023 Agrowon
हवामान

Monsoon Update 2023 : लक्षद्वीप बेटे, दक्षिण श्रीलंकेत मॉन्सूनची चाल; दुसऱ्या दिवशीही मॉन्सूनची वाटचाल

Weather News : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) सलग दुसऱ्या दिवशी अरबी समुद्रातील वाटचाल सुरूच ठेवली आहे. शुक्रवारी (ता. २) लक्षद्वीप बेटांचा काही भाग, दक्षिण श्रीलंकेत मॉन्सूनने प्रगती केल्याचे हवामान विभागाने जाहीर केले.

Team Agrowon

Monsoon Rain : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) सलग दुसऱ्या दिवशी अरबी समुद्रातील वाटचाल सुरूच ठेवली आहे. शुक्रवारी (ता. २) लक्षद्वीप बेटांचा काही भाग, दक्षिण श्रीलंकेत मॉन्सूनने प्रगती केल्याचे हवामान विभागाने जाहीर केले.

यंदा सर्वसाधारण वेळेच्या दोन दिवस आगोदरच, १९ मे रोजी मॉन्सून दक्षिण बंगालचा उपसागर, निकोबार बेटे आणि दक्षिण अंदमान समुद्रात मॉन्सून दाखल झाला. त्यानंतर मॉन्सूनची वाटचाल थांबली होती.

मंगळवारी (ता. ३०) संपूर्ण अंदमान, निकोबार बेटसमुह आणि अंदमान समुद्रासह पूर्व-मध्य बंगालच्या उपसागराच्या काही भागात, तर गुरूवारी (ता. १) अरबी समुद्रात मॉन्सून दाखल झाला.

शुक्रवारी (ता. २) मॉन्सूनने दक्षिण अरबी समुद्र, आणि मालदीवचा आणखी काही भाग, संपुर्ण कोमोरीन भाग, लक्षद्वीप बेटांचा काही भाग आणि दक्षिण बंगालचा उपसागर आणि पूर्व-मध्य बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात प्रगती केली आहे.

यंदा केरळातील मॉन्सूनचे आगमन लांबले असून, ४ जून पर्यंत मॉन्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने यापुर्वीच वर्तविली आहे.

दरम्यान, यंदा देशात सरासरी ९६ टक्के पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Lucerne Fodder: एकदा लागवड, तीन वर्षे चारा! पशुपालकांसाठी लसूणघास फायदेशीर

Fruit Insurance Refund: फळ पीकविमा परतावा अप्राप्त

Rabies Prevention Tips: रेबीज रोखण्यासाठी लसीकरणासह जनजागृती आवश्यक

Water Storage: प्रकल्प सलग सातव्या वर्षी १०० टक्के भरले

Fruit Crop Insurance: फळपीक विम्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

SCROLL FOR NEXT