Monsoon Agrowon
हवामान

Monsoon In Kerala: माॅन्सूनची वेळे आधीच केरळमध्ये धडक; ८ दिवस लवकर आला

IMD Forecast: माॅन्सूनने सुखद धक्का देत अंदाजित वेळेच्या एक दिवस आधीच देशात प्रवेश केला. माॅन्सून केरळमध्ये दाखल झाल्याचे हवामान विभागाने आज जाहीर केले.

Anil Jadhao 

Pune News: माॅन्सूनने सुखद धक्का देत अंदाजित वेळेच्या एक दिवस आधीच देशात प्रवेश केला. माॅन्सून केरळमध्ये दाखल झाल्याचे हवामान विभागाने आज जाहीर केले. तसेच सरासरी वेळेच्या तब्बल ८ दिवस आधीच केरळमध्ये दाखल झाला. माॅन्सून केरळमध्ये  २००९ मध्ये २३ मे रोजी दाखल झाला होता. त्यानंतर माॅन्सून दाखल होण्याची ही दुसरी वेळ आहे, असेही हवामान विभागाने म्हटले आहे. 

पोषक हवामान असल्याने यंदा माॅन्सून अंदमानमध्येही लवकर दाखल झाला होता. सर्वसाधारण वेळेच्या तब्बल पाच दिवस आधीच १३ मे रोजी मॉन्सून दक्षिण बंगालचा उपसागर, निकोबार बेटे आणि दक्षिण अंदमान समुद्रात मॉन्सून दाखल झाला होता. त्यानंतरही पोषक हवामान असल्याने पुढे वाटचाल करत माॅन्सून पुढे सरकला.

माॅन्सूनने बुधवारी श्रीलंकेचा बहुतांशी भाग व्यापला होता. त्यानंतर पुढील ५ दिवसांत म्हणजेच रविवारपर्यंत माॅन्सून केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला होता. बुधवारी माॅन्सून दक्षिण अरबी समुद्र, मालदीव आणि कोमोरिनचा काही भाग, बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात दाखल झाला होता. त्यानंतर माॅन्सूनने गुरुवारी आणि शुक्रवारी त्याच भागात मुक्काम केला होता. 

IMD Tweet

माॅन्सून दोन दिवस एकाच भागात रेंगाळला तरी रविवारपर्यंत माॅन्सून केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला होता. पण अंदाजित वेळेच्या एक दिवस आधीच माॅन्सूनने केरळमध्ये धडक दिली. हवामान विभागाने आज सकाळी माॅन्सून केरळमध्ये दाखल झाल्याचे ट्वीट करून जाहीर केले. 

सरासरी वेळेच्या ८ दिवस आधी देशात

देशातील भुमिवर म्हणजेच केरळमध्ये माॅन्सून दाखल होण्याची सरासरी तारीख १ जून आहे. मात्र यंदा माॅन्सून ८ दिवस आधीच केरळमध्ये दाखल झाला. माॅन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान असल्याने माॅन्सून ही झेप घेल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. 

माॅन्सून केरळमध्ये दाखल झाल्याची तारीख
वर्ष…तारीख

2009…23 मे

2010…31 मे

2011…29 मे

2012…5 जून

2013…1 जून

2014…6 जून

2015…5 जून

2016…8 जून

2017…30 मे

2018…29 मे

2019…8 जून

2020… 1 जून

2021…3 जून

2022…29 मे

2023…8 जून

2024…30 मे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Harbhara Tur Kharedi: हरभरा-तूर खरेदीला मुदतवाढ; मेअखेरपर्यंत दिलासा

Jintur Water Shortage: जिंतूर तालुक्यातील ३ गावांना ५ टँकरद्वारे पाणीपुरवठा

Yeola Acid Attack Case: ‘पोलिस मित्र’च निघाला शेतकऱ्यावरील अ‍ॅसिड हल्ल्याचा सूत्रधार

Parbhani Crop Insurance: परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण विमा परतावा द्या: कृषिमंत्री भरणे

Sustainable Farming: शेतकऱ्यांनी शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करावा

SCROLL FOR NEXT