Monsoon Update Agrowon
हवामान

Monsoon 2024 : माॅन्सून विदर्भात दाखल; राज्याच्या अनेक भागात पावसाचा अंदाज

Maharashtra Weather Update : माॅन्सूनच्या प्रगतीसाठी पोषक हवामान असून पुढील ४८ तासात माॅन्सून आणखी काही भागात प्रगती करेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला.

Anil Jadhao 

Pune News : माॅन्सूनही आजही राज्यातील काही भागात प्रगती केली. माॅन्सून आज जळगाव, अकोला आणि पूसदपर्यंत पोचला. तर माॅन्सूनच्या प्रगतीसाठी पोषक हवामान असून पुढील ४८ तासात माॅन्सून आणखी काही भागात प्रगती करेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला.

माॅन्सूनने आता राज्याचा निम्म्यापेक्षा जास्त भाग व्यापाला आहे. माॅन्सून राज्यात धुळे, जळगाव, बुलडाणा, अकोला, वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यात पोचला. माॅन्सूनने आत संपूर्ण कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्याचा बहुतांशी भाग व्यापला. तर माॅन्सूनने आज गुजरातमध्येही प्रवेश केला. तेलंगणाच्याही काही भागात माॅन्सून पोचला. 

माॅन्सूनची सिमा आज नवसारी, जळगाव, अकोला, पुसद, रामागुंडम, सुकमा, मलकानगरी आणि विजयानगरम या भागात होती. तसेच माॅन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान आहे. त्यामुळे पुढील ४८ तासांमध्ये माॅन्सून तेलंगणा आणि छत्तीसगडच्या आणखी काही भागात प्रगती करेल, असाही अंदाज हवामान विभागाने दिला. 

हवामान विभागाने आज आणि उद्या राज्यातील अनेक भागात पावसाचा अंदाज दिला. आज कोकणातील सिंधुदूर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला. तर उद्या विदर्भ तसेच मराठवड्यातील काही भागात मध्यम पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. गुरुवारी आणि शुक्रवारीही राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Fertiliser Linking : उत्तर प्रदेशच्या धर्तीवर खत लिकिंगसाठी महाराष्ट्रात नवा नियम आणणार; कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंची विधानसभेत माहिती

Crop Advisory: कृषी सल्ला : कोकण विभाग

Blight Disease: बदलत्या वातावरणात करपा रोगाची शक्यता

Raju Chaudhari Success Story: कडा ते कॅनडा

Nilesh Rane: कोकणातील आंबा, काजू बागायतदारांच्या मदत प्रश्नी निलेश राणेंनी कृषीमंत्र्यांना घेरले

SCROLL FOR NEXT