Monsoon Agrowon
हवामान

Monsoon Update : मॉन्सूनने महाराष्ट्र व्यापला

Latest Monsoon News : सुरुवातीला वाट पाहायला लावणाऱ्या नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) दोन दिवसांत वेगाने घोडदौड केली आहे.

Team Agrowon

Monsoon Update Pune : सुरुवातीला वाट पाहायला लावणाऱ्या नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) दोन दिवसांत वेगाने घोडदौड केली आहे. एकाच दिवसांत विक्रमी प्रगती करत मॉन्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे.

देशाचा बहुतांश भागांत त्याने धडक दिली आहे. पावसाने रविवारी (ता.२५) देखील महाराष्ट्रातील.....भागांत दमदार, तर.....भागात मध्यम हजेरी लावली. काही भागांत अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे.

केरळमध्ये ८ जून रोजी डेरेदाखल झाल्यानंतर ११ जून रोजी मॉन्सूनने कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात हजेरी लावली. ‘बिपॉरजॉय’ चक्रीवादळामुळे तब्बल १३ दिवस पुढील वाटचाल थांबली होती.

दुसरीकडे बंगालच्या उपसागरावरील शाखा बळकट झाल्याने पूर्व भारतात मॉन्सूनची घोडदौड सुरू होती. शनिवारी (ता.२४) अरबी समुद्रावरून मॉन्सूनने पुढे चाल केली. कोकण, पूर्व विदर्भासह दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागात मॉन्सूनने वाटचाल केली.

रविवारी (ता. २५) अरबी समुद्राचा आणखी काही भाग, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली, उत्तराखंड राज्याचा संपूर्ण भागात मॉन्सून पोहोचला आहे. गुजरात, राजस्थान, हरियाना, जम्मू- काश्मीरच्या काही भागातही तो दाखल झाला आहे. मॉन्सूनच्या वाटचालीची सीमा वेरावळ, वल्लभनगर, विद्यानगर, उदयपूर, अंबालापर्यंत आहे.

पुढील वाटचालीस पोषक हवामान असल्याने गुजरात, राजस्थान, हरियाना, पंजाबच्या आणखी काही भागांसह, संपूर्ण जम्मू-काश्मीरमध्ये मंगळवारपर्यंत (ता. २७) मॉन्सूनची प्रगती होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

थोडक्यात महत्त्वाचे...

- २०१९ मध्ये मॉन्सून उशिराने २० जून रोजी महाराष्ट्रात दाखल, तर २५ जून रोजी त्याने महाराष्ट्र व्यापला

- २०२२ मध्ये १९ जून रोजी मॉन्सूनने महाराष्ट्र व्यापला

- यंदा २५ जून रोजी संपूर्ण राज्यात दाखल

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT