Monsoon 2023 Agrowon
हवामान

Monsoon 2023 : उद्या मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज

maharashtra rain : हवामान विभागाने उद्या मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला.

Team Agrowon

IMD alert : राज्यातील काही भागात काल म्हणजेच सोमवारी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडल्या. पण आज बहुतांशी भागांमध्ये उन्हाचा चटका वाढला होता. दुसरीकडे शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत. तर हवामान विभागाने उद्या मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला.

हवामान विभागाने उद्या राज्यातील अनेक भागात जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज दिला. उद्या मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि नगर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी केला. तर मराठवाड्यातील बीड, धाराशिव, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांसह जोरदार पावसाचा अंदाज आहे. कोकणातील रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला.

राज्यात काही भागात पाऊस पडतो. पण या पावसाचे स्वरुप सार्वत्रिक नाही. तसेच खूपच कमी ठिकाणी पाऊस पडत आहे. आज नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर, जळगाव आणि धुळे या जिल्ह्यांमधील काही भागांमध्ये ठिकठिकाणी विजांसह हलक्या सरी पडतील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला. मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यातही विजांसह हलक्या पावसाचा अंदाज आहे. तर कोकणाताली रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये ढगांच्या गडगडाटासह काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडतील, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Hingoli Crop Loan : हिंगोली जिल्ह्यात पीककर्ज वाटपाचे ३५.१६ टक्के उद्दिष्ट साध्य

Rabi Season : पाच लाख ५४ हजार हेक्टरवर रब्बीत पेरणीचे कृषी विभागाकडून नियोजन

District Co-operative Bank : जिल्हा बँकेवर प्रशासक नियुक्तीच्या हालचाली

Amravati Rain Deficit : अमरावती जिल्ह्यात २२ दिवसांपासून पावसाचा खंड

Crop Damage Panchnama: पिकांवर रोटाव्हेटर फिरवू नका, नुकसानीच्या पंचनाम्यासाठी पुरावे राहतील, सहकारमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आवाहन

SCROLL FOR NEXT