Maharashtra Weather Agrowon
हवामान

Maharashtra Winter Weather : किमान तापमानात चढ-उतार

Maharashtra Weather Forecast : राज्यात तुरळक ठिकाणी वादळी पावसासह गारपिटीने तडाखा दिल्यानंतर अवकाळीचे सावट दूर झाले आहे. ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात वाढ होत थंडी गायब झाली आहे.

Team Agrowon

Pune News : राज्यात तुरळक ठिकाणी वादळी पावसासह गारपिटीने तडाखा दिल्यानंतर अवकाळीचे सावट दूर झाले आहे. ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात वाढ होत थंडी गायब झाली आहे. आज (ता. ३०) किमान तापमानात चढ - उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

राजस्थान आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून, त्यापासून उत्तर गुजरातपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. पूर्वेकडील वाऱ्यांच्या प्रभावामुळे आग्नेय अरबी समुद्रापासून दक्षिण महाराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडीचा कडाका काहीसा ओसरला आहे. रविवारी (ता. २९) राजस्थानच्या ‘सिकार’ येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ५.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यातही थंडी गायब झाली असून, धुळे येथील कृषी महाविद्यालयात येथे नीचांकी १४.४ अंश तापमान नोंदले गेले.

गेली दोन दिवस राज्याच्या विविध भागात हलक्या ते मध्यम पावसाच्या सरींसह तुरळक ठिकाणी गारपिटीने तडाखा दिला. रविवारी (ता. २९) राज्यात अंशतः ढगाळ हवामान झाले. पहाटेच्या वेळी धुक्याची दुलई कायम असल्याचे चित्र आहे. आज (ता. ३०) राज्यात तुरळक ठिकाणी ढगाळ हवामानासह किमान तापमानातील चढ-उतार कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

रविवारी (ता. २९) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३१.८ (१८), अहिल्यानगर ३०.८ (१९.५), धुळे २८ (१४.४), जळगाव २७ (१६.८), जेऊर ३३ (१७.५), कोल्हापूर ३० (१९.५), महाबळेश्‍वर २४.८ (१५.६), मालेगाव २८ (१९.२), नाशिक २९.३ (१५.४), निफाड २८ (१४.५), सांगली ३०.७ (१९.५),

सातारा ३१.३ (१९.२), सोलापूर ३३ (२१.२), सांताक्रूझ ३१.३ (१९.१), डहाणू २६.७ (१९), रत्नागिरी ३२.६ (२२.१), छत्रपती संभाजीनगर ३०.१ (१८.९), धाराशिव २७.८ (१७.०), परभणी ३०.६ (१८.४), परभणी कृषी विद्यापीठ ३१.९ (१५.७), अकोला ३१.७ (१९.६), अमरावती ३०.८ (१९.३), भंडारा ३१.६ (१८.२), बुलडाणा ३१ (१९), ब्रह्मपुरी ३२.९ (१७.४), चंद्रपूर ३०.४, गडचिरोली २९ (१७.४), गोंदिया ३०.२ (१८.४), नागपूर ३१.५ (१९.०), वर्धा ३२.२ (१८.६), वाशीम ३३.२ (१८.४), यवतमाळ ३१.५.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tenant Farmers: भाडेपट्ट्याने शेतजमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांनाही मिळणार पीक कर्ज, पीक विम्याचा लाभ, सरकारचा महत्त्वाचा निर्णय

Amaravati Water Crisis: अमरावती जिल्ह्यात लागताहेत २० टँकर

Water Scarcity: सोलापूर जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा; एक टँकर सुरू

MIDC Project: ‘एमआयडीसी’विरोधात आरपारच्या लढाईचे संकेत

Halad Nuksan: वादळी पावसामुळे हळदीचे नुकसान

SCROLL FOR NEXT