Rain Alert Agrowon
हवामान

Maharashtra Weather Forecast : राज्यात ४ दिवस पावसाचा अंदाज; विदर्भातील ८ जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाचा येलो अलर्ट

Weather Update : राज्यात काही भागात कडक ऊन तर काही भागात ढगाळ वातावरण अशी स्थिती दिसत आहे. राज्यातील उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज आहे.

अनिल जाधव

Pune News : राज्यात काही भागात कडक ऊन तर काही भागात ढगाळ वातावरण अशी स्थिती दिसत आहे. राज्यातील उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज आहे. तर मध्य महराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी विजांसह हलक्या पावसाचा अंदाज आहे. तर ढगाळ हवामानाचाही अंदाज हवामान विभागाने दिला.

हवामान विभागाने आज कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज दिला आहे. तर उद्या धुळे, नंदूरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज दिला आहे. यावेळी ढगाळ हवामान राहील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला.

गुरुवारी धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात ताही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज देण्यात आला. शुक्रवारी परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज आहे.

तर चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदीया, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला. या ८ जिल्ह्यांमध्ये ३० ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहतील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला.

शनिवारी वर्धा, नागपूर, गोंदीया, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला. पुढील ४ दिवस राज्यातील विविध भागात ढगाळ हवामान राहील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Banana Crop Damage: सातपुड्याच्या पायथ्याच्या केळी बागा जमीनदोस्त

Nangarat Literature Festival: जयसिंगपुरात रविवारी तिसरे ‘नांगरट’ साहित्य संमेलन

Diwali Magazine Award: ‘सकाळ माध्यम समूहा’च्या दिवाळी अंक संचाला पुरस्कार

Donald Trump Warning: लेबनॉनवरील हल्ला नेतान्याहू यांनी टाळला

Onion Seed Prices: कांदा बियाण्याला ६०० ते १२०० रुपयांपर्यंत दर

SCROLL FOR NEXT