Kharif Sowing  Agrowon
हवामान

Maharashtra Monsoon : राज्यात पावसाची दडी कायम; उन्हाचा चटका

maharashtra weather : आज (ता. ३१) राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. पावसात मोठा खंड पडल्याने अनेक भागांत पावसाची प्रतीक्षा आहे.

Team Agrowon

weather report today : पावसाची दडी कायम असल्याने राज्यात उन्हाचा चटका वाढला आहे. ढगाळ हवामानामुळे चांगलाच घामटा निघत आहे. आज (ता. ३१) राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. पावसात मोठा खंड पडल्याने अनेक भागांत पावसाची प्रतीक्षा आहे.

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा हिमालयाच्या पायथ्याकडे कायम आहे. ईशान्य बिहारपासून पूर्व मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत हवेचा आणखी एक कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. पूर्व मध्य बंगालच्या उपसागरात समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. मध्य प्रदेश परिसरावर, दक्षिण अंतर्गत कर्नाटक परिसरावर चक्राकार वाऱ्यांच्या स्थिती आहेत. तसेच कर्नाटकपासून कोमोरिन भागापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे.

राज्यात पावसाने उघडीप दिली असून, अनेक भागांत निरभ्र आकाशामुळे स्वच्छ सूर्यप्रकाश जमिनीवर येत असल्याने कमाल तापमानात वाढ झाली आहे. दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे तापदायक ठरत आहे. ऐन पावसाळ्यात उन्हाच्या झळा वाढल्या असून, अंगाची काहिली होत आहे. राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडत आहेत. आज (ता. ३१) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT