Rain update Agrowon
हवामान

Return Monsoon : कोकणात आज येलो अलर्ट; राज्यात काही भागात हलक्या पावसाचा अंदाज

IMD Alert : हवामान विभागाने आज आणि उद्या काही भागात पावसाचा अंदाज व्यक्त केला.

Anil Jadhao 

Rain Update : राज्यात सध्या दुपारी उन्हचा चटका असह्य होत आहे. तर काही भागात काही वेळ ढगाळ वातावरण होते आणि पुन्हा उन्हाचा चटका वाढतो, असं वातावरण सध्या पाहायला मिळत आहे. हवामान विभागाने आज आणि उद्या काही भागात पावसाचा अंदाज व्यक्त केला.

हवामान विभागाने आज कोकणात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला. कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट दण्यात आला. तर यावेळी ३० ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याचाही अंदाज आहे. तसेच कोल्हापूर, सातारा, पुणे, नगर, नाशिक, जळगाव आणि धुळ जिल्ह्यात हलक्या सरी पडण्याचा अंदाज आहे. उद्या सिधुदूर्ग, रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यातही काही ठिकाणी हलक्या सरी होतील, अशी शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली.

माॅन्सूनचा विचार केला तर माॅन्सून राज्याच्या एका कोपऱ्यात अडकलेला दिसतो. सिंधुदूर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला भागात माॅन्सूनची सीमा आजही आहे. माॅन्सून पुढील दोन दिवसांमध्ये देशाच्या आणखी काही भागातून माघार घेण्यास अनुकूल स्थिती आहे. माॅन्सून बिहारचा उर्वरित भाग, हिमालच्याच्या शेजारचा पश्चिम बंगाल आणि सिक्कम, संपूर्ण ईशान्य भारत, आंध्र प्रदेशचा काही भाग, तेलंगणाच्या उर्वरित भागातून पुढील ४८ तासांमध्ये माघार घेईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT