Weather Agrowon
हवामान

Winter Weather Forecast : जानेवारी ते मार्च देशात सरासरी पाऊस

India Rainfall Update : जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये देशाच्या बहुतांशी भागात सरासरी इतका पाऊस (८८ ते ११२ टक्के) पडण्याची शक्यता आहे.

अमोल कुटे

Pune News : जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये देशाच्या बहुतांशी भागात सरासरी इतका पाऊस (८८ ते ११२ टक्के) पडण्याची शक्यता आहे. जानेवारी महिन्यात किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहणार असल्याने देशात थंडी कमी राहणार आहे. मात्र उत्तर महाराष्ट्र, गुजरात आणि पश्‍चिम मध्य प्रदेशात थंडीच्या लाटांचा कालावधी अधिक राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

जानेवारी ते मार्च महिन्यांतील पावसाचा तसेच जानेवारी महिन्यातील पाऊस आणि तापमानाचा अंदाज बुधवारी (ता. १) हवामान विभागाने जाहीर केला. जानेवारी महिन्यात वायव्य भारताचा पूर्व भाग, मध्य भारताचा उत्तर भाग, आणि पूर्व भारताचा काही भाग वगळता देशाच्या बहुतांशी भागात किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे.

राज्याच्या किमान तापमानात घट होऊ लागल्याने डिसेंबर महिन्यात हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद झाली. मात्र पावसाळी वातावरण आणि उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या अभावामुळे महिनाअखेरीस थंडी पुन्हा गायब झाली. जानेवारी महिन्यात देशाच्या बहुतांशी भागात सरासरीच्या तुलनेत अधिक तापमानाची शक्यता असल्याने थंडी कमी राहण्याचे संकेत आहे. महाराष्ट्रातही उत्तर भाग वगळता उर्वरित भागात थंडी सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये देशात सरासरी इतका (८८ ते ११२ टक्के) पावसाची शक्यता आहे. या काळात देशात सरासरी ६९.७ मिलिमीटर पाऊस पडतो. उत्तर भारतातील राज्यात पावसाचे प्रमाण अधिक असते. महाराष्ट्रातही सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

विषुववृत्तीय प्रशांत महासागरात सध्या ‘एल-निनो’ स्थिती तटस्थ (एन्सो न्यूट्रल) स्थितीत आहे. जानेवारी ते मार्च या कालावधीत ‘ला- निना’ स्थिती तयार होण्याची शक्यता आहे. तर इंडियन ओशन डायपोल (आयओडी) देखील तटस्थ स्थितीत असून, पुढील काही महिने ही स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.

मॉन्सूनोत्तर हंगामात सरासरी पाऊस

मॉन्सूनोत्तर हंगामात (ऑक्टोबर ते डिसेंबर) देशात ११७.४ मिलिमीटर (९७ टक्के) पाऊस पडला आहे. या हंगामात महाराष्ट्रातील पावसाची सरासरी ९६.४ असून, यंदा राज्यात ९०.९ मिलिमीटर (९४ टक्के) पाऊस झाला आहे. केवळ डिसेंबर महिन्याचा विचार करता राज्यात सरासरी ४.६ मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा डिसेंबरमध्ये राज्यभरात २.३ मिलिमीटर म्हणजेच सरासरीच्या तुलनेत पावसात ४९ टक्क्यांची तूट दिसून आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Artificial Intelligence: ‘एआय’ उडविणार झोप ...

India UK Trade Deal: व्यापार कराराचे फलित

Waste Management: कचऱ्याच्या ढिगाखाली गाडलेली व्यवस्था

Paddy Nursery Update: भाताच्या ५८६१ हेक्टरवर रोपवाटिका

Free Seed Distribution: दुबार पेरणीसाठी मोफत बियाणे : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

SCROLL FOR NEXT