Summer Heat Agrowon
हवामान

Summer Heat Alert : कोकणात उष्ण व दमट हवामानाचा इशारा

IMD Weather Forecast : वादळी पावसाने उसंत घेताच राज्यात तापमानाच्या पाऱ्याने पुन्हा उसळी घेतली आहे. सूर्य तळपल्याने अनेक ठिकाणी ४० अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली आहे.

अमोल कुटे

Pune News : वादळी पावसाने उसंत घेताच राज्यात तापमानाच्या पाऱ्याने पुन्हा उसळी घेतली आहे. सूर्य तळपल्याने अनेक ठिकाणी ४० अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली आहे. आज (ता. ७) कोकणात उष्ण व दमट हवामानाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. राज्यात उन्हाचा चटका वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

दक्षिण अंतर्गत कर्नाटक आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत असून, मराठवाड्यापासून दक्षिण तमिळनाडूपर्यंत हवेचा दक्षिणोत्तर कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. यामुळे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरील बाष्पयुक्त वाऱ्यांचा संगम होत असल्याने राज्यासह दक्षिण भारतात ढगाळ हवामान आहे.

रविवारी (ता. ६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे उच्चांकी ४१.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अकोला, ब्रह्मपुरी, अमरावती येथे ४१ अंशांपेक्षा अधिक, तर मालेगाव, धुळे, जळगाव, नागपूर आणि यवतमाळ येथे ४० अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. तसेच नाशिक, सोलापूर, जेऊर, छत्रपती संभाजीनगर, परभणी (कृषी), भंडारा, बुलडाणा, गडचिरोली आणि वर्धा येथे तापमान ३९ अंशांपेक्षा अधिक होते.

तापमानात वाढ होऊ लागल्याने झळा वाढल्या आहेत, तर उकाड्यातील वाढ कायम आहे. आज (ता. ७) कोकणात उष्ण व दमट हवामानाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह कमाल तापमानात वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

रविवारी (ता. ६) सकाळी ८.३० पर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

पुणे---३८.०---१७.६

अहिल्यानगर---३७.९---१७.४

धुळे---४०.५---१६.५

जळगाव---४०.५---२१.०

जेऊर---३९.०---१९.०

कोल्हापूर---३६.३---२३.०

महाबळेश्‍वर---३०.८---१८.६

मालेगाव---४०.६---२१.६

नाशिक---३९.१---१८.७

निफाड---३८.३---१४.६

सांगली---३७.४---२३.९

सातारा---३७.०---१९.८

सोलापूर---३९.६---२५.४

सांताक्रूझ---३५.९---२४.१

डहाणू---३६.९---२२.१

रत्नागिरी---३५.४---२४.६

छत्रपती संभाजीनगर---३९.४---२३.२

धाराशिव---३७.०---२१.०

परभणी---३७.८---२२.८

परभणी (कृषी)---३९.०---१९.०

अकोला---४१.७---२२.५

अमरावती---४१.२---२१.३

भंडारा---३९.६---२१.६

बुलडाणा---३९.६---२१.६

ब्रह्मपुरी---४१.३---२१.९

चंद्रपूर---४१.८---निरंक

गडचिरोली---३९.०---२१.०

गोंदिया---३८.८---१९.५

नागपूर---४०.२---२१.२

वर्धा---३९.१---२१.९

वाशीम---३७.६---निरंक

यवतमाळ---४०.०---२३.०

सरासरी तापमान (अंश से.)

विभाग---किमान---कमाल

विदर्भ---१९.५---४१.८

मराठवाडा---१९.४---३९.४

पश्‍चिम महाराष्ट्र---१७.६---३९.६

उत्तर महाराष्ट्र---१४.६---४०.६

कोकण---२२.१---३६.९

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

Crop Insurance Scheme: नांदेडमध्ये पीकविमा योजनेत ९ लाखांहून अधिक अर्ज

Irrigation Projects : रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना गती

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

SCROLL FOR NEXT