Cloud Agrowon
हवामान

Monsoon 2023 Forecast : पुढील पाच दिवस पाऊसमान कसं राहील?

Monsoon Prediction : पावसाने राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढवली. मागील तीन दिवसांपासून पाऊस गायब झाला. काही ठिकाणी जोरदार सरी होतात.

Team Agrowon

Maharashtra Monsoon Update : पुणेः पावसाने राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढवली. मागील तीन दिवसांपासून पाऊस गायब झाला. काही ठिकाणी जोरदार सरी होतात. पण अशी ठिकाणं खूपच थोडी आहेत. तर काही भागात हलक्या सरी दिसतात. पुढील पाच दिवसही शेतकऱ्यांसाठी चिंतेचे जाण्याची शक्यता आहे.

माॅन्सूनची स्थिती आज राज्यात पावसाला पोषक दिसत नाही. सध्या उत्तर बांगलादेशच्या भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. ही स्थिती ईशान्य बिहार आणि शेजारच्या भागात पसरलेली दिसते. ही स्थिती समुद्रसपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर आहे. माॅन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा पंजाबमधील अमृतसर, नजीबाबाद, गोरखपूर, सपौल, बालूरघाट आणि पूर्व मनिपूरपर्यंत पसरलेला आहे.

राज्यात मागील तीन दिवसांपासून पाऊस थांबला आहे. आजही पावासाचा जोर नव्हता. काही ठिकाणी मध्यम स्वरुपाच्या सरी झाल्या. पण हा पाऊस सर्वदूर नव्हता. तर राज्यात काही ठिकाणी हलक्या सरी पडल्या. सकाळी आणि दुपारनंतर राज्याच्या अनेक भागात ढगाळ वातावर होते. राज्यात आजही पाऊस नव्हता. पावसाची उघडीप असल्याने आंतरमशागतीच्या कामांना वेग आला. पण काही भागांमध्ये पिकांना पावसाचा ताण बसत आहे.

हवामान विभागाने पुढील पाच दिवस राज्यात पावासची विश्रांती राहील, असा अंदाज व्यक्त केला. बुधवार ते रविवार राज्यात जोरदार पावसाची शक्यता नाही. काही भागात हलक्या सरी होण्याचा अंदाज आहे. तर काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस पडून शकतो, असाही अंदाज हवामान विभागाने दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur Assembly Election : कोल्हापुरात महाडिक पॅटर्न; मुश्रीफ, यड्रावकरांनी गड राखला, महाविकास आघाडीचा सुफडासाफ

Chana Wilt Disease : हरभरा पिकातील ‘मर रोग’

Animal Care : म्हशींच्या प्रजननासाठी हिवाळा ठरतो लाभदायक

Maharashtra Vidhansabha 2024 Live Result : राज्यातील पहिला निकाल जाहीर; वडाळा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कोळंबकर विजयी

Satara Assembly Election 2024 : साताऱ्यातील जनतेचा महायुतीकडे कल, सर्वच मतदारसंघात भाजप महायुतीची आघाडी

SCROLL FOR NEXT