Cold Weather Agrowon
हवामान

Maharashtra Cold : थंडी किती दिवस राहणार ? राज्यात पुढील पाच दिवस हवामान कसे राहील?

Weather Update : उत्तर महाराष्ट्रात थंडीची हूडहुडी कायम आहे. तर कोकणात मध्यम आणि विदर्भ तसेच मराठवाड्यात साधारण थंडी जाणवत आहे.

Anil Jadhao 

Pune News : उत्तर महाराष्ट्रात थंडीची हूडहुडी कायम आहे. तर कोकणात मध्यम  आणि विदर्भ तसेच मराठवाड्यात साधारण थंडी  जाणवत आहे. थंडीची सध्याची स्थिती २६ जानेवारीपर्यंत कायम राहू शकते, असा अंदाज हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला. 

सध्याच्या हवामानाबद्दल सांगताना श्री खुळे म्हणाले की, मुंबईसह कोकण आणि विदर्भ वगळता महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, उत्तर सातारा तसेच छत्रपती संभाजीनगर, जालना ह्या ११ जिल्ह्यांमध्ये १९ ते २३ जानेवारीपर्यंत पहाटेचे किमान तापमान  १० ते १२ अंशाच्या दरम्यान राहू शकते.

तर दुपारचे कमाल तापमान २६ अंश म्हणजे किमान आणि कमाल तापमान सरासरी इतके तर काही भागात सरासरीपेक्षा एखाद्या अंशाने राहू शकतात, असेही खुळे यांनी सांगितले. 

मुंबईसह कोकणात १९ ते २३ जानेवारीपर्यंत पहाटेचे किमान तापमान हे १४ अंश तर दुपारचे कमाल तापमान २६ अंश राहू शकते. म्हणजेच किमान आणि कमाल तापमान सरासरी इतके तर काही भागात सरासरीपेक्षा एखाद्या अंशाने कमी राहू शकते. दक्षिण कोकणात कमाल तापमान वाढ ही एखाद्या अंशाने अधिक असेल. 

विदर्भ व मराठवाड्यातील उर्वरित जिल्ह्यात १९ ते २३ जानेवारीपर्यंत पहाटेचे किमान तापमान १४ ते १६ अंश तर दुपारचे कमाल तापमान २८ अंश दरम्यान राहू शकते. किमान आणि कमाल तापमान काही भागात सरासरीपेक्षा एखाद्या अंशाने अधिक राहू शकतात.

विदर्भात २३  जानेवारीनंतर ३ दिवसांसाठी म्हणजे २५ जानेवारीपर्यंत ढगाळ वातावरण राहून थंडी काहीशी कमी होईल. अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते, अन्यथा नाही, असेही खुळे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Relief : रायगडच्या शेतकऱ्यांना दिलासा; बांधावर जाऊन नुकसानीची वस्तुनिष्ठ नोंद घेण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश

Organic Gardening : शाळेच्या परसबागेतून ७२५ रुपयांचे उत्पन्न

Farmer Crisis : शेतकरी अडचणीत, तातडीने आर्थिक मदत करा : रोहित पवार

Sugarcane Rate : हुतात्मा कारखान्याने ३८५० रुपये दर देण्याची शेतकरी संघटनेची मागणी

Rajarambapu Milk Union : राजारामबापू दूध संघाचा मराठवाड्यात विस्तार

SCROLL FOR NEXT