Summer Weather Agrowon
हवामान

Maharashtra Summer Forecast: कोकणात उष्णता आणि दमट हवामानाचा इशारा: उन्हाचा तडाखा कायम

Vidarbha Heatwave Alert: राज्यात उन्हाचा पारा सातत्याने वाढत असून विदर्भात तीव्र उष्णतेची लाट जाणवत आहे. ब्रह्मपुरी येथे देशातील सर्वाधिक ३८.६ अंश तापमानाची नोंद झाली आहे. दुसरीकडे, कोकणात उष्ण व दमट हवामानाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

अमोल कुटे

Pune News: विदर्भात उन्हाचा चटका कायम असल्याने सोमवारी (ता. ३) सकाळ पर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे देशातील उच्चांकी ३८.६ अंश तापमान नोंदले गेले. राज्यात उन्हाची ताप वाढल्याने कमाल तापमान ३६ अंशांपार पोचले आहे. आज (ता. ४) दक्षिण कोकणात उष्ण व दमट हवामानाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भासह उर्वरित राज्यात उन्हाच्या झळा कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

सोमवारी (ता. ३) विदर्भातील ब्रह्मपुरीपाठोपाठ चंद्रपूर येथे ३८.२ अंश तापमान नोंदले गेले. तर सोलापूर, मालेगाव, जेऊर, सांगली, अकोला, भंडारा, वर्धा, यवतमाळ येथे तापमानाचा पारा ३७ अंशावर होता. तर पुणे, धुळे, जळगाव, सातारा, रत्नागिरी, परभणी, गडचिरोली, आणि नागपूर येथे ३६ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. राज्यात दिवस रात्रीच्या उकाड्यातही वाढ झाल्याचे दिसून आले.

विदर्भात उन्हाचा चटका कायम असतानाच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही कमाल तापमानात वाढ होत आहे. आज (ता. ४) कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत उष्ण व दमट हवामान राहणार असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. तर विदर्भासह उर्वरित राज्याच्या कमाल तापमानातील वाढ कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

सोमवारी (ता. ३) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

पुणे---३६.२---१७.१

अहिल्यानगर---निरंक---१७.३

धुळे---३६.०---१३.०

जळगाव---३६.२---१६.२

जेऊर---३७.५---१९.०

कोल्हापूर---३५.५---२२.१

महाबळेश्वर---२९.३---१८.६

मालेगाव---३७.६---१८.०

नाशिक---३५.६---१६.६

निफाड---३४.०---१२.१

सांगली---३७.२---२०.८

सातारा---३६.१---१९.०

सोलापूर---३७.९---२२.४

सांताक्रूझ---३५.१---२१.२

डहाणू---३१.३---२०.०

रत्नागिरी---३६.९---२१.६

छत्रपती संभाजीनगर---३५.४---२०.४

धाराशिव---३५.४---२०.७

परभणी---३६.६---२०.४

परभणी (कृषी)---३६.०---१५.६

अकोला---३७.७---२०.२

अमरावती---३५.४---१८.७

भंडारा---३७.०---१९.०

बुलडाणा---३५.०---२१.४

ब्रह्मपुरी---३८.६---१९.९

चंद्रपूर---३८.२---निरंक

गडचिरोली---३६.०---१७.०

गोंदिया---३५.४---१८.२

नागपूर---३६.७---१८.२

वर्धा---३७.०---२०.०

वाशीम---३५.६---निरंक

यवतमाळ---३७.०---१८.४

सरासरी तापमान (अंश से.)

विभाग---किमान---कमाल

विदर्भ---१७.०---३८.६

मराठवाडा---१५.६---३६.६

पश्‍चिम महाराष्ट्र---१७.१---३७.९

उत्तर महाराष्ट्र---१२.१---३७.६

कोकण---२०.०---३६.९

उष्ण व दमट हवामानाचा इशारा (येलो अलर्ट) :

रत्नागिरी, सिंधुदुर्ग.

३७ अंशापेक्षा अधिक तापमान असलेली ठिकाणे :

ब्रह्मपुरी ३८.६, चंद्रपूर ३८.२, सोलापूर ३७.९, अकोला ३७.७, मालेगाव ३७.६, जेऊर ३७.५, सांगली ३७.२, भंडारा ३७, वर्धा ३७, यवतमाळ ३७.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Milk Adulteration Racket: गोरखधंदा भेसळीचा!

Maharashtra Vanshree Award 2024: ‘छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार’ जाहीर

Early Banana Harvesting: आगाप कांदेबाग केळीची काढणी खानदेशात सुरू

Pandharpur ST Buses: आषाढी यात्रेसाठी एसटीच्या ५,५०० विशेष बसगाड्या

Coco Peat GST: बियाण्यांप्रमाणे कोकोपीटही जीएसटीमुक्त करण्यात यावे; राज्य भाजीपाला नर्सरी असोसिएशन

SCROLL FOR NEXT