Rain  Agrowon
हवामान

Monsoon Update: उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात वीजांसह जोरदार पावसाची शक्यता

Maharashtra Rain Update: राज्यात बहुतांश भागात अद्यापही जोरदार पावसाची प्रतिक्षा कायम आहे. कमाल तापमानात वाढ झाल्याने उन्हाचा चटका वाढू लागला आहे, तर तुरळक ठिकाणी पावसाचा जोरही कायम आहे.

Dhananjay Sanap

Pune News: राज्यात बहुतांश भागात अद्यापही जोरदार पावसाची प्रतिक्षा कायम आहे. कमाल तापमानात वाढ झाल्याने उन्हाचा चटका वाढू लागला आहे, तर तुरळक ठिकाणी पावसाचा जोरही कायम आहे. आज राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

हवामान विभागाने कोकणातील पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा कायम आहे. पुढील चार दिवस कोकणात जोरदार पावसाची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर एक ते दोन ठिकाणी मंगळवार ते शनिवार दरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक जिल्ह्यात मंगळवारी आणि बुधवारी जोरदार पावसाचा अंदाज आहे.

तसेच आज मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे आणि वीजांसह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर संपूर्ण मराठवाड्यात पुढील चार दिवस हलक्या ते मध्यम पावसाच्या सरींचा अंदाज देण्यात आला आहे.

तसेच विदर्भातील अमरावती, भंडारा, चंद्रपुर, गडचिरोली, नागपूर, वर्धा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे वीजांसह जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे. तर उर्वरित महाराष्ट्रातही हलक्या ते मध्यम पावसाच्या सरींची शक्यता आहे.

राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमानाचा पारा तिशीच्या पार आहे. त्यामुळे उन्हाचा चटकाही जाणवू लागला आहे. तर काही भागात ढगाळ वातावरणात ऊन-सावळीचा खेळ सुरू आहे. मागील चोवीस तासात सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३४ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. तर मध्य, पूर्व आणि वायव्य भारतात मॉन्सून सक्रिय असल्याने पुढील ६ ते ७ दिवस तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fake Agriculture Pesticide: बनावट कीडनाशकांची उलाढाल ११ हजार कोटींवर

October Heat: ‘ऑक्टोबर हीट’चा चटका वाढतोय

Maharashtra Drought Declaration: नव्याने १९ तालुके दुष्काळी

Agriculture PG Admission: पदव्युत्तर प्रवेशावरील तक्रारींवर कृषी परिषदेचा खुलासा

Sugar Hoarding Restrictions: साखरेच्या साठ्यावर केंद्राची मर्यादा

SCROLL FOR NEXT