Maharashtra Rain Agrowon
हवामान

Maharashtra Weather Forecast: कोकण, घाटमाथा, पूर्व विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज

Weather Alert: कोकणासह, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम आहे. उर्वरित राज्यात मात्र पावसाने दडी दिली आहे. आज (ता. २६) मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यासह पावसाच्या जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) आहे.

अमोल कुटे

Pune News: कोकणासह, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम आहे. उर्वरित राज्यात मात्र पावसाने दडी दिली आहे. आज (ता. २६) मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यासह पावसाच्या जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) आहे. तर कोकण आणि पूर्व विदर्भात राज्यात जोरदार सरींची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

मध्य प्रदेश आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वारे वाहत आहेत. वायव्य बंगालच्या उपसागरात उत्तर ओडिशा, पश्‍चिम बंगालच्या किनाऱ्यालगत ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. या वाऱ्यांच्या प्रभावामुळे आज (ता. २६) कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याची शक्यता आहे.

यातच अरबी समुद्रापासून गुजरात, मध्य महाराष्ट्र, ते मध्य प्रदेशातील चक्राकार वाऱ्यांपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. मंगळवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मराठवाड्यातील परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात राज्यातील उच्चांकी ३६.८ अंश तापमानाची नोंद झाली. कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.

आज (ता. २६) पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर जोरदार सरींची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज असल्याने, तसेच उर्वरित विदर्भात विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात मुख्यतः उघडिपीसह हलक्या पावसाची शक्यता आहे.

दिल्लीत मॉन्सूनची प्रगती शक्य

नैॡत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) मंगळवारी (ता. २४) उत्तर अरबी समुद्र, हिमाचल प्रदेश, जम्मू- काश्मीरचा उर्वरित भाग, पश्‍चिम उत्तर प्रदेशचा आणखी काही भाग, हरियाना, पंजाबच्या आणखी काही भागात प्रगती केली. आज (ता.२६) राजधानी दिल्लीसह राजस्थान, पंजाब, हरियानाचा आणखी काही भाग, तसेच पश्चिम उत्तर प्रदेश उर्वरित भागात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे.

बुधवारी (ता. २५) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान. (अंश सेल्सिअसमध्ये)

‎ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

‎पुणे---२७.७---२३.९

अहिल्यानगर---२९.२---२३.७

‎‎धुळे---३२.०---२१.४

जळगाव---३०.०---२४.५

जेऊर---३२.०---२०.५

‎‎कोल्हापूर---२५.४---२२.२

‎महाबळेश्‍वर---२०.१---१८.५

मालेगाव---२९.२---२२.६

‎‎नाशिक---२८.५---२३.१

‎निफाड---३०.३---२३.०

‎सांगली---२८.७---२३.०

‎सातारा---२४.८---२२.८

‎सोलापूर---३०.६---२४.२

‎सांताक्रूझ---३०.९---२७.०

डहाणू---२९.९---२५.९

‎रत्नागिरी---३०.३---२७.१

‎छत्रपती संभाजीनगर---२९.०---२३.५

‎धाराशिव---३१.६---२१.८

‎परभणी---३१.६---२६.०

परभणी (कृषी)---३६.८---२३.२

‎‎अकोला---२७.९---२४.३

अमरावती---२७.४---२१.९

भंडारा---३१.०---२४.०‎‎

बुलडाणा---२६.६---२३.३

‎ब्रह्मपुरी---३२.३---२३.६

‎चंद्रपूर---३२.६---२४.६

‎गडचिरोली---२९.६---२३.८

‎गोंदिया---३१.०---२३.८

‎नागपूर---३१.०---२३.८

‎वर्धा---२९.०---२३.८

‎वाशीम---३१.५---२२.८

‎यवतमाळ---२७.०---२३.४

जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :

पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

विजांसह वादळी पावसाची शक्यता (येलो अलर्ट) :

बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा, यवतमाळ.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agri Shop License Suspension: नांदेडला सोळा कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित

Crop Loan Limit: यवतमाळ जिल्ह्यासाठी पीककर्ज मर्यादेत हेक्टरी वाढ

Agriculture Technology: तंत्रज्ञानाशिवाय नैसर्गिक शेतीला गती नाही

Unseasonal Rain Damages: पूर्व मोसमी पावसाने साडेचारशे हेक्टरवरील पिके बाधित

Agriculture Awareness: युरिया, डीएपी खतांचा संतुलित वापर काळाची गरज

SCROLL FOR NEXT