Rain Agrowon
हवामान

Maharashtra Monsoon Rain: राज्यात काही भागात जोरदार पावसाचा अंदाज; विदर्भ, कोकणातील काही भागात जोर कायम राहणार

Rain Forecast: राज्यातील काही भागात पाऊस हजेरी लावत आहे. तर काही भागात अद्यापही पावसाची प्रतिक्षा आहे. मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात पावसाने दडी मारली आहे.

Anil Jadhao 

Pune News: राज्यातील काही भागात पाऊस हजेरी लावत आहे. तर काही भागात अद्यापही पावसाची प्रतिक्षा आहे. मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात पावसाने दडी मारली आहे. हवामान विभागाने पुढील ५ दिवस कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिला. तर मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच राहण्याची शक्यता आहे.

माॅन्सूनने आज कालच्याच भागात मुक्काम केला होता. काल माॅन्सूनने उत्तर अरबी समुद्राचा आणि हिमाचल प्रदेश तसेच जम्मुचा उरलेला भाग व्यापला होता. तर पश्चिम उत्तर प्रदेशचा आणखी काही भाग, हरियानाचा आणखी काही भाग, चंदीगडचा आणखी काही भाग आणि पंजाबचा आणखी काही भाग माॅन्सूनने व्यापला होता.

माॅन्सूनची सिमा आज बारमेर, जोधपूर, जयपूर, आग्रा, रामपूर, बिजनोर, कर्नाल आणि हलवारा भागात होती. माॅन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान आहे. त्यामुळे पुढील ३६ तासांत माॅन्सून राजस्थान, पंजाब आणि हरियानाच्या काही भागात प्रगती करण्याची शक्यता आहे. तर पश्चिम उत्तर प्रदेशाचा उरलेला भागही माॅन्सून व्यापेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला. 

हवामान विभागाने पुढील ५ दिवस कोकणातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज दिला. तर मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावरही पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्येही पुढील ५ दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यताही हवामान विभागाने दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Masala Business Success: अस्सल चवीच्या रिठे मसाल्यांनी मिळविली ग्राहकांची पसंती

Collective Farming Model: एकत्र आलो म्हणून पुढे गेलो...

Maharashtra Drought Crisis: होरपळीच्या सुलतानी झळा

Onion Procurement Irregularities: ‘खरे’ उत्तर मिळेल?

Water Shortage Management: पुणे जिल्ह्यात टंचाईमुळे पाणी नियोजनाला वेग

SCROLL FOR NEXT