Rain Agrowon
हवामान

Maharashtra Rain : राज्यात अनेक ठिकाणी विजांसह जोरदार पाऊस

Team Agrowon

Pune News : राज्यातील वातावरणात वेगाने बदल होत आहे. मागील दोन दिवसांपासून अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. सोमवारी (ता. २३) सकाळी आठ वाजेपर्यंत जालन्यातील गोंधी येथे सर्वाधिक १०० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडत असल्याने खरिपातील काढणीच्या अवस्थेत असलेल्या पिकांना नुकसानकारक ठरत आहे.

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील विविध भागात ढगाळ वातावरण आहे. दिवसभर कडक ऊन तर सायंकाळी वातावरणात बदल होत आहे. अचानक ढग भरून येत असून जोरदार पाऊस पडत आहे. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात रविवारी सायंकाळी अनेक ठिकाणी दमदार पाऊस झाला. श्रावण येथे सर्वाधिक ७२ मिलिमीटर पाऊस पडला असून पावसामुळे वाढीच्या अवस्थेत असलेल्या भात पिकांना दिलासा मिळत आहे. रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांतही अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. या पावसामुळे ओढे नाल्याच्या पाण्याच्या प्रवाहात काही काहीशी वाढ झाली.

मध्य महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. जिल्ह्यातील येळवी येथे ७४ मिलिमीटर, तर तासगाव ६७, बेडग ६६ मिलिमीटर पाऊस झाला. तर अधूनमधून उन पडले. सोमवारी जिल्ह्यातील विविध भागात सकाळी पाऊस, दुपारनंतर कधी ढगाळ तर ऊन पडले होते. कोल्हापूर जिल्ह्यात पाऊस सुरूच आहे. जयसिंगपूर, हातकणंगले, नृसिंहवाडी येथे जोरदार पाऊस झाला. साताऱ्यातही काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडला. सोलापुरात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. नगरमधील शेवगाव तालुक्यात दोन ठिकाणी जोरदार पाऊस पडला असून उर्वरित भागात उघडीप होती. नाशिकमधील निफाड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील थेरगाव परिसरात एक तास मुसळधार पाऊस पडला असून भाजीपाला लागवडीमध्ये पाणी साचले होते. पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. भोरमधील वेळू येथे ४४ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. या पावसामुळे हवेत काहीसा गारवा तयार झाला असला तरी अनेक ठिकाणी पिकांच्या काढणी केलेल्या बाजरी, सोयाबीन, मूग, उडीद अशा पिकांच्या नुकसानीस कारणीभूत ठरत आहे.

मराठवाड्यात पावसाचे प्रमाण कमीअधिक आहे. छत्रपती संभाजीनगर मधील आपेगाव येथे ६४ मिलिमीटर, तर पैठण ४१ मिलिमीटर, जालन्यातील गोंधीनंतर सुखापुरी येथे ५६ मिलिमीटर पाऊस झाला. परभणीतील कासापुरी येथे ४६ मिलिमीटर पाऊस पडला. बीडमध्ये सर्वदूर जोरदार पाऊस झाला असून कावडगाव येथे ७९ मिलिमीटर पाऊस झाला. इतर भागात अधूनमधून शिडकावा होत होता. या पावसामुळे काढणी केलेल्या पिकांचे नुकसान होत आहे. विदर्भातील वाशीममधील मालेगाव येथे सर्वाधिक पाऊस पडला. या पावसामुळे वाढीच्या अवस्थेत असलेल्या तूर, कापूस पिकांना फटका बसला आहे. जिल्ह्यात सलग दोन दिवस झालेल्या पावसाने सोंगणी केलेल्या सोयाबीन सुड्या ओल्या झाल्या आहेत. पीक वाचविण्यासाठी शेतकरी कामाला लागला आहे. अमरावतील पळसखेड, मंगरूळ येथेही जोरदार पाऊस झाला. तर यवतमाळमधील अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडला असून तुरळक ठिकाणी हलक्या सरी बरसल्या. चंद्रपुरातील खांबडा येथे मुसळधार पाऊस पडल्याने ओढे, नाले भरून वाहत होते. तर वर्धा जिल्ह्याच्या काही भागात हलका पाऊस झाला आहे.

सोमवारी (ता.२३) सकाळी आठ वाजेपर्यंत मंडलनिहाय झालेला पाऊस, मिलिमीटरमध्ये : (स्रोत ः कृषी विभाग)

कोकण : किहीम ३४, भांबेड ४२, पडेल ४३, मीठबाव ४१, शिरगाव ४०, बापर्डे ४०, पेंडूर ५५, मसूरे ४२, श्रावण ७२, पोइप ७१, म्हापण ५३, कुडाळ ५५, पिंगुळी ५२.

मध्य महाराष्ट्र : शेवगाव ४०, एरंडगाव ४१, वेळू ४४, वडाळा ४०, वैराग ४४, किन्हई ४५, पुसेसावळी ४०, निमसोड ५३, तरडगाव ४५, आरग ५२, सांगली ६१, बुधगाव, कसबे डिग्रज, कवठेपिरान, भाळवणी ५७, कोरेगाव, तांदूळवाडी ४३, शिराळा ४०, भिलवडी ४६, अंकलखोप ४७, वांगी ५९, नेवरी ६५, हातकणंगले ५४, नृसिंहवाडी ५२, जयसिंगपूर ५५, शिरढोण ४०, आंबा ४६.

मराठवाडा : म्हाळसजावळा ५५, नळवंडी ६४, राजूरी, पिंपळनेर ५२, पेंडगाव ६८, मांजरसुभा ५५, थेरळा ४०, गेवराई ८०, जातेगाव ५६, धोंडराई ४७, उमापूर ५६, चाकळआंबा ७१, सिरसदेवी ४२, रेवकी ८०, तळवडा ४४, माजलगाव ५४, गांगामासळा ६५, नित्रूड ६७, सिरसाळा ५४, तळेगाव ५१, तिंतरवणी ५६.

विदर्भ : वाशीम, कोंढाळा ४४, मालेगाव ७५, शिरपूर, करंजी ४२, पळसखेड ४७, मंगरूळ ६७, अकोलाबाजार ४४, अर्णी, बोरगाव ४३, वनी ४१, राजूर ४८, रसा ४४, खांबडा ९९.

पाऊस दृष्टिक्षेपात...

- कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यांत हलका ते जोरदार पाऊस.

- पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत काही ठिकाणी जोरदार.

- मराठवाड्यात बीड जिल्ह्यांत काही ठिकाणी जोरदार पाऊस.

- बीडमधील रेवकी, गेवराई येथे ८० मिलिमीटर पाऊस.

- वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Techniques : सुधारित तंत्राने वाढवली ज्वारी, गव्हाची उत्पादकता

Milk Measurement : दूध संस्थांतील चुकीच्या कामांना वैधमापन शास्त्र विभागाचे प्रोत्साहन; अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

Amit Shah Kolhapur : अमित शाह यांच्या दौऱ्यावेळी 'स्वाभिमानी' दाखवणार काळे झेंडे

Watershed Management : संख्यात्मक मूल्यमापन कोण करणार?

MPSC Exam : कृषी सेवेतील पदासंह संयुक्त पूर्व परीक्षेची नवी तारीख जाहीर; १ डिसेंबर रोजी परीक्षेचं एमपीएससीकडून आयोजन

SCROLL FOR NEXT