Monsoon 2024 Agrowon
हवामान

Monsoon Rain : पावसाचा जोर २ दिवस राहणार; राज्यातील बहुतांशी भागात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज

Maharashtra Monsoon Update : हवामान विभागाने आणखी २ दिवस पावसाचा जोर जास्तच राहील, असा अंदाज दिला.

Anil Jadhao 

Pune News : राज्यात कालपासून पाऊस पडत आहे. विदर्भ, कोकण आणि मराठवाड्यात काही ठिकाणी जोरदार पावसाने दाणादाण केली. हवामान विभागाने आणखी २ दिवस पावसाचा जोर जास्तच राहील, असा अंदाज दिला. 

राज्याच्या बहुतांशी भागात पाऊस पडत आहे. कोकणात पावसाचा जोर अधिक आहे. सिंधुदूर्ग, रत्नागिरीला रेड अलर्ट देण्यात आला. तर रायगड, मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला.

पुणे आणि सातारा जिल्ह्यातही घाटमाथ्यावर काही ठिकाणी अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे. तर कोल्हापूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. संपूर्ण विदर्भ, संपूर्ण मराठवाडा आणि खानदेशातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. 

उद्या सिंधुदूर्ग, रत्नागिरी, पुणे आणि सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. तर संपूर्ण विदर्भ, संपूर्ण मराठवाडा, कोकणातील इतर जिल्हे आणि मध्यम महाराष्ट्रातील पुणे आणि सातार वगळून इतर जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला. 

पावसाने मागील दोन दिवसांमध्ये राज्यातील बहुतांशी भागांमध्ये हजेरी लावली. कोकण किनारपट्टीला पाऊस चांगलाच झोडपून काढत आहे. विदर्भातील अकोला, बुलडाणा आणि वाशीम जिल्ह्यातही चांगला पाऊस झाला. बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात पावसाचा जोर जास्त होता. विदर्भतील इतरही जिल्ह्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात पाऊस पडला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orange Fruit Drop: शुक्लकाष्ठ फळगळीचे!

Pimpalapur Farmer Death Assistance: पिंपळापूर येथील आत्महत्याग्रस्त कुटुंबाची प्रशासनाकडून भेट; शासकीय योजनांचा लाभ देण्याची कार्यवाही

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT