Rain Update  Agrowon
हवामान

Maharashtra Rain Update : दक्षिण कोकणात जोरदार पावसाचा इशारा

Latest Rain Update : मॉन्सून पुन्हा सक्रिय होऊ लागल्याने राज्यात पावसाला सुरूवात झाली आहे. काही ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली आहे.

Team Agrowon

Weather Update Pune : मॉन्सून पुन्हा सक्रिय होऊ लागल्याने राज्यात पावसाला सुरूवात झाली आहे. काही ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली आहे.

आज (ता. ४) दक्षिण कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पावसाचा 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे. संपूर्ण विदर्भासह मराठवाड्याच्या काही भागात विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा हिमालयाच्या पायथ्याकडे कायम आहे. वायव्य उत्तर प्रदेशमध्ये समुद्र सपाटीपासून१.५ ते ३.१ किलोमीटर उंचीवर, ओडिशामध्ये समुद्र सपाटीपासून ४.५ ते ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. यातच बंगालच्या उपसागरातील संभाव्य कमी दाब क्षेत्रामुळे राज्यात मॉन्सून पुन्हा सक्रिय होण्यास पोषक हवामान होत आहे.

राज्यात पावसाला पोषक हवामान झाले असले तरी, उन्हाचा चटका आणि उकाडा वाढला आहे. आज (ता. ४) कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

संपूर्ण विदर्भासह मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड जिल्ह्यात विजांसह पाऊस पडण्याचा इशारा आहे. तर उर्वरित राज्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

कमी दाब क्षेत्राची होतेय निर्मिती

ईशान्य बंगालच्या उपसागरात समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. या वाऱ्यांच्या प्रभावामुळे मंगळवारपर्यंत (ता. ५) या भागात हवेचे कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. वरील चक्राकार वाऱ्यांपासून उत्तर आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

जोरदार पावसाचा इशारा :

रत्नागिरी, सिंधुदुर्ग.

विजांसह पावसाचा इशारा :

धाराशिव, लातूर, नांदेड, बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Survey : २३ हजार गावांमध्ये नुकसानीचे सर्वेक्षण पूर्ण; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती

PM Dhan Dhaanya Krishi Yojana: सर्वोत्कृष्ट १० जिल्ह्यांत छत्रपती संभाजीनगर

Goat Pregnancy Diagnosis: शेळी, मेंढीमधील गर्भनिदान

Tick Infestation Management: गोठ्यातील गोचीड प्रादुर्भावाचे नियंत्रण

Uzzi Fly Management: उझी माशी व्यवस्थापनासाठी निसोलीनक्स थायमसचा वापर

SCROLL FOR NEXT