Rain Update  Agrowon
हवामान

Rain Forecast : कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा

Latest Rain Update : राज्यात मॉन्सून सक्रिय झाल्याने कोकणात मुसळधार, तर उर्वरित महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार पाऊस कोसळत आहे.

Team Agrowon

Weather Update Pune : राज्यात मॉन्सून सक्रिय झाल्याने कोकणात मुसळधार, तर उर्वरित महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार पाऊस कोसळत आहे. आज (ता. ९) कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा 'येलो अलर्ट' आहे. विदर्भात विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला असून, उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र निवळल्यानंतर आग्नेय मध्य प्रदेश आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. ही प्रणाली आणखी दोन दिवस कायम राहण्याची शक्यता आहे.

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा सर्वसाधारण स्थितीच्या दक्षिणेकडे सक्रिय असून, जैसलमेर, कोटा. रायसेन, पेंद्रा रोड, जमशेदपूर, दिघा ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. महाराष्ट्राच्या उत्तर भागात पूर्व-पश्चिम वाऱ्यांचे जोडक्षेत्र आहे.

राज्यात मॉन्सूनचा पाऊस सक्रिय झाल्याने शुक्रवारी (ता. ८) कोकणात दमदार पाऊस कोसळला. मध्य महाराष्ट्र, घाटमाथ्यावर मुसळाधर तर मराठवाडा आणि विदर्भात हलक्या ते जोरदार पावसाने हजेरी लावली.

आज (ता. ९) कोकणात सर्वदूर, मध्य महाराष्ट्रातील जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा आहे, तर खानदेश आणि विदर्भात विजांसह पावसाची इशारा देण्यात आहे. तर उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा.

विजांसह पावसाचा इशारा :

नंदूरबार, धुळे, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tur Dharwad Method: तूर लागवडीची धारवाड पद्धत, हेक्टरी उत्पादन थेट २५-२६ क्विंटलपर्यंत!

Inspirational Story: गावाच्या पाणी प्रश्‍नासाठी झगडणारा सुनील

Crop Damage Compensation GR: चार जिल्ह्यांतील २२ हजार शेतकऱ्यांना दिलासा; मार्चमधील 'अवकाळी'च्या नुकसानीपोटी १६ कोटी मदत मंजूर

Krishna River: कृष्णा नदीत रविवारपर्यंत उपसाबंदी

Agrowon Podcast: काकडीला उठाव कायम; सोयाबीनमध्ये घट, कापसात चढ उतार, गव्हाचा भाव स्थिर, केळीला उठाव

SCROLL FOR NEXT