Rain Forecast Agrowon
हवामान

Rain Forecast : कोकण, घाटमाथ्यावर जोरदार पाऊस शक्य

Latest Rain Update : मॉन्सूनच्या पावसाने जोर धरल्याने राज्याच्या अनेक भागांत मध्यम ते जोरदार पाऊस कोसळला. धरणांच्या पाणलोटात झालेल्या पावसाने नद्यांना पूर आले.

Team Agrowon

Weather Update Pune : मॉन्सूनच्या पावसाने जोर धरल्याने राज्याच्या अनेक भागांत मध्यम ते जोरदार पाऊस कोसळला. धरणांच्या पाणलोटात झालेल्या पावसाने नद्यांना पूर आले. आज (ता. १०) कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा ‘येलो अलर्ट’ आहे. उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा सर्वसाधारण स्थितीच्या दक्षिणेकडे सक्रिय असून, जैसलमेर, अजमेर, गुणा, मंडला, पेंद्रा रोड, दिघा ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे.

मध्य प्रदेश आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. त्यापासून दक्षिण मध्य महाराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. अंदमान समुद्रात चक्राकार वारे वाहत असून, पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात मंगळवारपर्यंत (ता. १२) नव्याने चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे.

पावसासाठी पोषक हवामान असल्याने राज्यात पावसाचे पुनरागमन झाले. अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस कोसळला. आज (ता. १०) कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे.

तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT