Monsoon Rain Agrowon
हवामान

Maharashtra Rain : कोकण, घाटमाथ्यावर जोरदार पाऊस

Rain Update : कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांत अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडला. पालघरमध्ये सर्वदूर मुसळधार पाऊस कोसळला.

Team Agrowon

Pune News : कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांत अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडला. पालघरमध्ये सर्वदूर मुसळधार पाऊस कोसळला. तर लोणावळा, शिरगाव, दावडी, ताम्हिणी या घाटमाथ्यावर धुवाधार पाऊस बरसला. यामुळे कोकणातील आणि मध्य महाराष्ट्राच्या पश्‍चिम भागातील धरणांतील पाणीपातळीत वाढ होऊ लागली आहे.

मंगळवारी (ता. २) कोकण, मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत पावसाच्या हलक्या सरी बरसत होत्या. कोल्हापुरात जोरदार तर वर्धा, सांगलीत हलका आणि साताऱ्यातही पाऊस पडत आहे.
राज्यातील काही भागांत पावसाचा जोर कमीअधिक होत आहे. मागील काही दिवसांपासून कोकणात पावसाची संततधार सुरूच आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी भात खाचरे भरून वाहू लागले आहेत.

सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरण असल्याने अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळला. पालघरमधील विक्रमगड मंडलात सर्वाधिक ११४.३ मिलिमीटर पाऊस पडला. ठाणे जिल्ह्यातील भाईंदर मंडलात ६५.८ मिलिमीटर, अंगाव ८०.५, डिघशी ५९.८, रायगडमधील जांभूळपाडा ६३, कसू ६०.३ मिलिमीटर पाऊस पडला.

रत्नागिरी जिल्ह्यातही पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी पडत होत्या. पालघर जिल्ह्यात वसई मंडलात ९४.८ मिलिमीटर, तलवड ८२.३, मांडवी, निर्मल, मानिकपूर ७८.८, वाडा, कोणे, कांचगड ७३.५ मिलिमीटर पाऊस पडला. सततच्या पावसामुळे भात रोपांची वाढ चांगली असल्याने अनेक ठिकाणी भात रोपे लागवडीयोग्य झाली आहे. काही ठिकाणी भात लागवडीला सुरुवात झाली आहे.

खानदेशातील धुळे, नंदुरबार, जळगाव पावसाचे प्रमाण कमी आहे. या भागात अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा लागून आहे. अनेक ठिकाणी पिके सुकत असून, पाऊस नसल्याने पेरण्याही खोळंबल्याची स्थिती आहे. तुरळक ठिकाणी पेरण्या झाल्या असल्या तरी अधूनमधून होत असलेल्या पावसामुळे पिकांना दिलासा मिळत आहे. पुणे, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांच्या पश्‍चिम भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे.

पुणे जिल्ह्यातील नसरापूर, कार्ला मंडलात मुसळधार पाऊस पडला. या पावसामुळे ओढे, नाले, धबधबे वाहू लागले आहेत. कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात मध्यम ते जोरदार पाऊस सुरू होता. शाहूवाडी, राधानगरी, गगनबावडा तालुक्यांत मध्यम जोरदार पाऊस सुरू आहे, पूर्व भागात मात्र एक दोन तासांनी एखादी हलकी सर व ढगाळ हवामान असे स्वरूप राहिले. राधानगरी धरणातून ११०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी व तेरवाड, कासारी नदीवरील यवलूज, वारणा नदीवरील चिंचोली व माणगांव असे नऊ बंधारे पाण्याखाली आहेत.

नगर, सोलापूर जिल्ह्यांत पाऊस नसला तरी पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरच्या पूर्व भागात अजूनही जोरदार पाऊस झालेला नाही. मराठवाड्यात पाऊस नसला तरी अधूनमधून ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत. परंतु लवकर पेरणी केलेल्या ठिकाणी पिकांची वाढ चांगली आहे. अनेक ठिकाणी शेतात कामे सुरू असून, दमदार पावसाची अजूनही गरज आहे.

मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली भागांत मागील दोन ते तीन दिवसांपासून पाऊस पडत असल्यामुळे पेरणी वेगात सुरू आहे. तर विदर्भातही गडचिरोली जिल्ह्यातील येवळी मंडलात ५६.५, धानोरा ५६.५ मिलिमीटर पाऊस पडला. यामुळे शेतकरी सुखावले असून बुलडाणा, अमरावती, वाशीम, वर्धा, यवतमाळ, नागपूर भागात दोन दिवसांपूर्वी चांगला पाऊस पडला. यामुळे सोयाबीन, मूग, उडीद पिकांच्या पेरण्या अंतिम टप्यात आल्या आहेत. तर काही ठिकाणी अजूनही पेरण्या झालेल्या नाहीत. ज्या ठिकाणी लवकर पेरण्या झाल्या होत्या. अशा ठिकाणी पिकांची वाढ जोमदार असून पावसाची अत्यंत आवश्यकता आहे.

या मंडलात पडला सर्वाधिक पाऊस (स्रोत : कृषी विभाग)

आबलोली ११०, झरी १०७.३, नसरापूर १००.५, कार्ला १०३.

मंगळवारी (ता. २) सकाळी आठ वाजेपर्यंत झालेला मंडलनिहाय पाऊस (स्रोत ः कृषी विभाग)
कोकण : मालयण ७२.३, साइवन ६३.५, पालघर ६२.८, साखर ६३, मोखडा ५७.५, खोडला ५९.३.
मध्य महाराष्ट्र : घोटी ९६.८, वेळुंजे ६०.५, दहादेवाडी ६६.३, लोणावळा ९०.३, वेल्हा ८९, पानशेत ५९.५, आंबवणे ९९, महाबळेश्‍वर ७६.८, चरण ८३.५, राधानगरी ५९.८, सरवडे ७९, कसबा ६१.३.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Garlic Rate : लसणाची आवक घटल्याने दर तेजीतच

Forest Fire : वणवे नियंत्रणासाठी जनजागृती करण्याची गरज

Sugarcane Labor Migration : निवडणूक संपताच ऊसतोड मजुरांचे स्थलांतर

Sugarcane FRP : मंडलिक साखर कारखाना इतरांच्या बरोबरीने दर देणार

Milk Rate : देशातील दूध उत्पादनात ४ टक्के वाढ; केंद्रीय मंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT