Rain Update Agrowon
हवामान

Weather News : परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील ३१ मंडलांत जोरदार पाऊस

Heavy Rain : परभणी-हिंगोली जिल्ह्यांतील ३१ मंडलांत बुधवारी (ता. २४) सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत विजांचा कडकडाट, वाऱ्यासह हलका ते जोरदार पाऊस झाला.

Team Agrowon

Weather Update Hingoli/Parbhani : परभणी-हिंगोली जिल्ह्यांतील ३१ मंडलांत बुधवारी (ता. २४) सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत विजांचा कडकडाट, वाऱ्यासह हलका ते जोरदार पाऊस झाला. परभणी जिल्ह्यात वीज कोसळून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. तर एक जण जखमी झाला.

याशिवाय दोन जनावरे दगावली तर एक जखमी झाले. मॉन्सूनपूर्व पावसामुळे उन्हाळी भुईमुगासह इतर पिकांच्या सुगीच्या कामाचा खोळंबा झाला.

परभणी जिल्ह्यातील १४ मंडलांत विजांच्या कडकडाटात हलका ते जोरदार पाऊस झाला. परभणी तालुक्यातील पेडगाव, जांब, जिंतूर तालुक्यातील बोरी, आडगाव, चारठाणा, वाघी धानोरा, सेलू तालुक्यातील वालूर, कुपटा, चिकलठाणा, मोरेगाव, मानवत तालुक्यातील कोल्हा, ताडबोरगाव, सोनपेठ तालुक्यातील सोनपेठ, शेळगाव या मंडलांत पावसाने हजेरी लावली.

वीज कोसळून निवळी खुर्द (ता. जिंतूर) येथील लक्ष्मण ठोंबरे (वय ५५) यांचा मृत्यू झाला. तसेच त्यांचा एक बैल दगावला. तर मुंजाभाऊ अंभुरे हे जखमी झाले. कौसडी (ता. जिंतूर) येथे वीज कोसळून गाय ठार झाली, तर म्हैस जखमी झाली.

हिंगोलीतील १७ मंडलांत पाऊस

हिंगोली जिल्ह्यातील १७ मंडलांत हलका ते जोरदार पाऊस झाला. हिंगोली तालुक्यातील हिंगोली, नरसी नामदेव, सिरसम, बासंबा, डिग्रस कऱ्हाळे, खंबाळा, कळमनुरी तालुक्यातील कळमनुरी, नांदापूर, डोंगरकडा, वारंगा, वसमत तालुक्यातील टेंभुर्णी, औंढा नागनाथ तालुक्यातील औंढा नागनाथ, येळेगाव, साळणा, सेनगाव तालुक्यातील सेनगाव, गोरेगाव, साखरा या मंडलांत पाऊस झाला

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fertilizer Stock Update: युरियाच्या साठ्यात घट, डीएपीची मुबलकता

Farmer Cup Competition: ‘फार्मर कप’ स्पर्धेत लाखोंची बक्षिसे

Betel Leaf Benefits: हृदय दौर्बल्यावर विड्याची पाने गुणकारी

Onion Farmer Crisis: कांदा पिकामध्ये सोडल्या मेंढ्या

Global AI Award India 2026: ‘एडीटी’ला ‘ग्लोबल ‘एआयॲवॉर्ड इंडिया २०२६’ जाहीर

SCROLL FOR NEXT