Monsoon Rain Agrowon
हवामान

Monsoon Rain Forecast: राज्यात काही ठिकाणी मुसळधारेचा अंदाज; सोमवारपासून विदर्भात पावसाची उघडीप राहण्याची शक्यता

Rain Update: राज्यातील काही भागात जोरदार पाऊस पडत आहे. पूर्व विदर्भात पावसाचा जोर काहीसा अधिक होता. खानदेश आणि मराठवाड्यातही काही ठिकाणी पाऊस हजेरी लावत आहे.

Anil Jadhao 

Pune News: राज्यातील काही भागात जोरदार पाऊस पडत आहे. पूर्व विदर्भात पावसाचा जोर काहीसा अधिक होता. खानदेश आणि मराठवाड्यातही काही ठिकाणी पाऊस हजेरी लावत आहे. हवामान विभागाने विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज दिला. 

माॅन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा म्हणजेच माॅन्सून ट्रफ सुरतगड, सिकर, ग्वालियर, सिध्दी, दौलतगंज, कोन्ताई ते अग्नेय बंगालच्या उपसागरापर्यंत आहे. तर हरियाना आणि शेजारच्या परिसरावर चक्राकार वारे वाहत आहेत. तसेच छत्तीसगड आणि शेजारच्या परिसरावर चक्राकार वारे वाहत असून ईशान्य मध्य प्रदेश आणि शेजारच्या परिसरावरही वारे वाहत आहेत.

आज विदर्भातील अमरावती, नागपूर, भंडारा आणि गोंदीया तसेच मराठवाड्यातील जालना आणि परभणी जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला. विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशीम आणि चंद्रपूर जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज देण्यात आला. मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक आणि खानदेशातील ३ जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाचा अंदाज आहे. 

उद्या विदर्भातील अमरावती, नागपूर, भंडारा आणि गोंदीया तर मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा तसेच धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामा विभागाने दिला. मध्य महाराष्ट्रातील इतर भागात हलक्या पावसाचा अंदाज आहे. कोकणातही उद्यापासून काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. 

सोमवारीपासून पुढील ३ दिवस विदर्भात पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे. सोमवारी खानदेशातील जळगाव, धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला. मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर तसेच नगर जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. कोकणातील जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: उडदाचे भाव दबावातच; कांदा दर स्थिर,कापूस दर दबावातच, लसणाचे भाव स्थिर, हिरवी मिरची टिकून

Agriculture Scheme: शेतकऱ्यांना रोपवाटीकेसाठी ५० टक्क्यांपर्यंत अनुदान मिळणार

Dahi Handi 2025 : कोकण नगरच्या गोविंदाची १० थर रचत विश्वविक्रमाला गवसणी

Monsoon Heavy Rain: राज्यात जोरदार पावसाचा अंदाज; विदर्भ, कोकणात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता

Banana Karpa Disease: केळीवरील करपा रोगाचे व्यवस्थापन

SCROLL FOR NEXT