Maharashtra Monsoon Update : महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागावर ९९८ हेप्टापास्कल, तर मध्यावर १००० हेप्टापास्कल इतक्या कमी हवेच्या दाबाची शक्यता गुरुवार (ता. १९)पर्यंत राहण्याची शक्यता आहे. शुक्रवार व शनिवारी (ता. २०,२१) १००० ते १००२ हेप्टापास्कल इतके कमी हवेचे दाब राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज (ता.१५) कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांत अतिवृष्टीची, रायगड व ठाणे जिल्ह्यांत जोरदार, तर पालघर जिल्ह्यात मध्यम पावसाची शक्यता आहे.
उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यात मध्यम, विदर्भात हलक्या आणि पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सातारा व पुणे जिल्ह्यांत आज जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. काही भागांत अतिवृष्टीची शक्यता राहील. सोलापूर व सांगली जिल्ह्यांत हलक्या आणि अहिल्यानगर जिल्ह्यात मध्यम पावसाची शक्यता आहे. सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग साधारणच राहील. कमाल व किमान तापमानात घसरण होईल. आकाश सर्वच जिल्ह्यांत ढगाळ राहील.
दक्षिण गोलार्धातून ढगांचा समूह उत्तर गोलार्धातील अरबी समुद्राच्या दिशेने येत असून, पुन्हा दक्षिणेकडे वळून श्रीलंकेपासून तो बंगालच्या उपसागरावर येऊन हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झालेल्या ठिकाणी त्या दिशेने उत्तरेकडे जाऊन मध्य भारताच्या दिशेने वाहत आहे. त्यातूनच अरबी समुद्र व बंगालच्या उपसागराची शाखा कार्यरत होऊन वारे महाराष्ट्रावरील हवेचे कमी दाबाचे क्षेत्राच्या दिशेने येत आहेत. त्यामुळेच या आठवड्यात काही भागात हलका, काही भागात मध्यम, तर काही भागात जोरदार, मुसळधार ते अतिवृष्टीची शक्यता निर्माण होईल.
अरबी समुद्राच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान २९ अंश सेल्सिअस, हिंदी महासागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान ३० ते ३१ अंश सेल्सिअस आणि बंगालच्या उपसागराच्या पाण्याचे पृष्ठभागाचे तापमानही ३१ अंश सेल्सिअसपर्यंत वाढल्याने मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होऊन ढगनिर्मिती होत आहे. तर प्रशांत महासागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान पेरूजवळ १७ अंश सेल्सिअस आणि इक्वॅडोरजवळ २२ अंश सेल्सिअस इतके कमी झालेले आहे. हा ‘ला-निना’चा प्रभाव आहे.
कोकण
आज (ता.१५) सिंधुदुर्ग जिल्ह्यात १२० मि.मी. रत्नागिरी जिल्ह्यात ९६ मि.मी., रायगड जिल्ह्यात ६० मि.मी., ठाणे जिल्ह्यात ६० मि.मी. आणि पालघर जिल्ह्यात १८ मि.मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत वायव्येकडून, तर रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत नैर्ऋत्येकडून राहील. सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ८ कि.मी. राहील. कमाल तापमान सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत २९ अंश सेल्सिअस, रायगड जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस, तर ठाणे व पालघर जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस राहील.
किमान तापमान ठाणे जिल्ह्यात २० अंश सेल्सिअस, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत २१ अंश सेल्सिअस, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस आणि पालघर जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअस राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता सिंधुदुर्ग व पालघर जिल्ह्यांत ९१ ते ९३ टक्के, तर रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत ८६ ते ८९ टक्के आणि ठाणे जिल्ह्यात ७८ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत ८४ ते ८६ टक्के, तर रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत ७० टक्के राहील.
उत्तर महाराष्ट्र
आज (ता.१५) नाशिक व जळगाव जिल्ह्यांत १५ मि.मी., तर नंदुरबार व धुळे जिल्ह्यांत ९ ते १० मि.मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याचा ताशी वेग १७ ते २० कि.मी., तर दिशा नैर्ऋत्येकडून राहील. कमाल तापमान नाशिक जिल्ह्यात ३५ अंश सेल्सिअस, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत ३६ अंश सेल्सिअस आणि जळगाव जिल्ह्यात ३७ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नाशिक जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअस, तर धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांत २५ अंश सेल्सिअस राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता जळगाव जिल्ह्यात ६७ टक्के, तर धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत ७८ टक्के आणि नाशिक जिल्ह्यात ८८ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता धुळे, जळगाव व नंदुरबार जिल्ह्यांत ३७ ते ४० टक्के, तर नाशिक जिल्ह्यात ६६ टक्के राहील.
मराठवाडा
धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी या जिल्ह्यांत आज (ता.१५) ७ ते १० मिमी हलक्या पावसाची शक्यता आहे. तर हिंगोली, जालना जिल्ह्यांत १२ ते १४ मि.मी. मध्यम पावसाची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २५ मि.मी. आणि बीड जिल्ह्यात ३२ मि.मी. जोरदार पावसाची शक्यता आहे. सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग परभणी, धाराशिव, नांदेड, हिंगोली जिल्ह्यांत १४ कि.मी., तर लातूर, बीड जिल्ह्यांत ताशी १६ कि.मी.,
जालना जिल्ह्यात ताशी १६ ते १८ कि.मी. आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ताशी २५ कि.मी. राहील. कमाल तापमान लातूर व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस, धाराशिव जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस, तर बीड जिल्ह्यात ३४ अंश सेल्सिअस राहील. हिंगोली, परभणी आणि जालना जिल्ह्यांत कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस, तर नांदेड जिल्ह्यात ३७ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान धाराशिव, लातूर, बीड, हिंगोली व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत २२ ते २३ अंश सेल्सिअस राहील.
तर परभणी, जालना व नांदेड जिल्ह्यांत किमान तापमान २४ ते २५ अंश सेल्सिअस राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता धाराशिव, बीड, हिंगोली व जालना जिल्ह्यांत ८० ते ८८ टक्के, तर लातूर, नांदेड, परभणी व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत ९० ते ९३ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता धाराशीव व बीड जिल्ह्यांत ५१ ते ५६ टक्के, नांदेड जिल्ह्यात ६५ टक्के, तर परभणी, हिंगोली, लातूर, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत ७० ते ७७ टक्के राहील.
पश्चिम विदर्भ
आज (ता.१५) बुलडाणा, अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत ५ ते ६ मि.मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा बुलडाणा व अकोला जिल्ह्यांत वायव्येकडून तर वाशीम व अमरावती जिल्ह्यांत नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग अमरावती जिल्ह्यात ताशी ९ कि.मी., वाशीम जिल्ह्यात ताशी १३ कि.मी., तर बुलडाणा व अकोला जिल्ह्यात ताशी १५ कि.मी. राहील. कमाल तापमान वाशीम व बुलडाणा जिल्ह्यांत ३५ अंश सेल्सिअस, तर अकोला व अमरावती जिल्ह्यांत ३७ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान बुलडाणा व वाशीम जिल्ह्यांत २७ अंश सेल्सिअस, तर अकोला व अमरावती जिल्ह्यांत २८ अंश सेल्सिअस राहील.
मध्य विदर्भ
आज (ता.१५) यवतमाळ, वर्धा व नागपूर जिल्ह्यांत ६ ते ७ मि.मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून, तर ताशी वेग ७ ते ८ कि.मी. राहील. कमाल तापमान यवतमाळ, वर्धा व नागपूर जिल्ह्यांत ३८ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत किमान तापमान २९ अंश सेल्सिअस राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता यवतमाळ जिल्ह्यात ८० टक्के, तर वर्धा व नागपूर जिल्ह्यांत ६५ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता यवतमाळ जिल्ह्यात ६१ टक्के, तर वर्धा व नागपूर जिल्ह्यांत ३६ टक्के राहील.
पूर्व विदर्भ
आज चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत ५ ते ८ मि.मी. पावसाची शक्यता आहे. चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून, तर गडचिरोली जिल्ह्यात पूर्वेकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत ताशी ७ ते ९ कि.मी., तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ८ ते ९ कि. मी. राहील. कमाल तापमान चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत ३७ अंश सेल्सिअस, तर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत ३९ अंश सेल्सिअस राहील.
किमान तापमान चंद्रपूर जिल्ह्यात २५ अंश सेल्सिअस, गडचिरोली जिल्ह्यात २७ अंश सेल्सिअस, गोंदिया जिल्ह्यात २८ अंश सेल्सिअस आणि भंडारा जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत ८१ टक्के, तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ६५ ते ७० टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता चंद्रपूर जिल्ह्यात ६१ टक्के, तर गडचिरोली जिल्ह्यात ४१ टक्के आणि भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ३२ टक्के राहील.
पश्चिम महाराष्ट्र
आज कोल्हापूर, सातारा व पुणे जिल्ह्यांत ७० ते ८० मि.मी. इतक्या अधिक पावसाची शक्यता असून अतिवृष्टी होणे शक्य आहे. सांगली व सोलापूर जिल्ह्यांत १० मि.मी., तर अहिल्यानगर जिल्ह्यात ३० मि.मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांत ८ ते १० कि.मी., तर सांगली व सोलापूर जिल्ह्यांत ताशी ११ ते १२ कि.मी. राहील. कमाल तापमान कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत २९ अंश सेल्सिअस, तर सातारा जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस राहील. पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यांत कमाल तापमान ३२ ते ३३ अंश सेल्सिअस, तर सोलापूर जिल्ह्यात ३४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान कोल्हापूर, सातारा, सोलापूर व पुणे जिल्ह्यांत २० अंश सेल्सिअस, तर सांगली, अहिल्यानगर जिल्ह्यात २१ अंश सेल्सिअस राहील.
कृषी सल्ला
भात लागवडीसाठी गादीवाफ्यावर भाताची रोपे तयार करावीत.वांगी, टोमॅटो, ढोबळी मिरची, मिरची या पिकांची रोपे गादीवाफ्यावर तयार करावीत.वाफसा आलेल्या ठिकाणी मूग, मटकी, चवळी, घेवडा, तूर, सोयाबीन, बाजरी, भुईमूग, तीळ, सूर्यफूल या पिकांच्या पेरण्या कराव्यात. जनावरांना रोग प्रतिबंधक लस पशुवैद्यकीय तज्ज्ञांकडून टोचून घ्यावी.कुक्कुट पक्ष्यांना आजारांसाठी प्रतिबंधात्मक लसीकरण करून घ्यावे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.