Rain Forecast Agrowon
हवामान

Weather Update : विदर्भात उष्णतेची लाट ओसरली, राज्यात पावसाचे संकेत

Rain Alert : उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

अमोल कुटे

Pune News : राज्याच्या कमाल तापमानात घट झाल्याने विदर्भात आलेली उष्णतेची लाट ओसरली आहे. राज्यात पावसाला पोषक हवामान होत असल्याने आज (ता. १९) उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मंगळवारी (ता. १८) सकाळपर्यंतच्या २४ तासांत ओडिशातील बौध येथे देशातील उच्चांकी ४३.५ अंश तापमानाची नोंद झाली. राज्यात चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी ४०.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

अकोला, गडचिरोली आणि वाशीम येथे तापमान ४० अंशापार होते. जेऊर, सोलापूर, परभणी, नागपूर आणि वर्धा येथे कमाल तापमान ३९ अंशांपार होते. राज्यात उन्हाच्या चटका आणि उकाडा तापदायक ठरत आहे.

पावसाला पोषक हवामान झाल्याने अंशतः ढगाळ हवामान होत आहे. आज (ता. १९) उत्तर महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, जळगाव, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाला पोषक हवामान आहे. उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मंगळवारी (ता. १८) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

पुणे---३८.२---१६.७

अहिल्यानगर---निरंक---१६.३

धुळे---३७.५---१४.६

जळगाव---निरंक---१९.८

जेऊर---३९.५---२०.०

कोल्हापूर---३५.८---२३.६

महाबळेश्वर---३२.७---१९.१

मालेगाव---३७.२---१७.८

नाशिक---३५.६---१५.४

निफाड---३६.०---११.६

सांगली---३८.३---२३.०

सातारा---३७.४---२०.०

सोलापूर---३९.६---२३.९

सांताक्रूझ---३४.४---२२.८

डहाणू---३३.४---२०.०

रत्नागिरी---३४.०---२४.२

छत्रपती संभाजीनगर---३७.२---१९.६

धाराशिव---३८.१---२१.६

परभणी---३९.०---२१.५

परभणी (कृषी)---३८.२---१७.५

अकोला---४०.१---२१.०

अमरावती---३६.६---२०.७

भंडारा---३८.२---२१.४

बुलढाणा---३६.०---२२.०

ब्रह्मपूरी---निरंक---२१.८

चंद्रपूर---४०.६---निरंक

गडचिरोली---४०.०---२०.०

गोंदिया---३७.६---२०.०

नागपूर---३९.४---२०.४

वर्धा---३९.०---२१.०

वाशीम---४०.०---निरंक

यवतमाळ---३८.८---२२.०

सरासरी तापमान (अंश से.)

विभाग---किमान---कमाल

विदर्भ---२०.०---४०.६

मराठवाडा---१७.५---३९.०

पश्‍चिम महाराष्ट्र---१६.७---३९.६

उत्तर महाराष्ट्र---११.६---३७.५

कोकण---२०.०---३४.४

विजांसह पावसाची शक्यता :

नंदूरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Harbhara Tur Kharedi: हरभरा-तूर खरेदीला मुदतवाढ; मेअखेरपर्यंत दिलासा

Jintur Water Shortage: जिंतूर तालुक्यातील ३ गावांना ५ टँकरद्वारे पाणीपुरवठा

Yeola Acid Attack Case: ‘पोलिस मित्र’च निघाला शेतकऱ्यावरील अ‍ॅसिड हल्ल्याचा सूत्रधार

Parbhani Crop Insurance: परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण विमा परतावा द्या: कृषिमंत्री भरणे

Sustainable Farming: शेतकऱ्यांनी शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करावा

SCROLL FOR NEXT