हवामान

Heat Wave Alert : मुंबईसह कोकणात उष्ण लाटेचा इशारा

Summer Heat : सूर्य तळपायला लागल्याने उन्हाचा चटका वाढू तापदायक ठरत आहे. यातच उकाड्यात मोठी वाढ झाल्याने अंगाची लाही होत आहे.

अमोल कुटे

Pune News : सूर्य तळपायला लागल्याने उन्हाचा चटका वाढू तापदायक ठरत आहे. यातच उकाड्यात मोठी वाढ झाल्याने अंगाची लाही होत आहे. रविवारी (ता. ९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर ३९.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता. १०) मुंबईसह कोकणात उष्ण लाटेची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात उन्हाची ताप कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

रविवारी (ता. ९) सकाळपर्यंतच्या २४ तासांत आंध्र प्रदेशातील कर्नूल येथे देशातील उच्चांकी ३९.४ अंश तापमानाची नोंद झाली. राज्यात सोलापूर पाठोपाठ अकोला येथे ३९ अंश सेल्सिअस, तसेच जेऊर, सांगली, सातारा, पुणे, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, नागपूर येथे कमाल तापमान ३८ वर पोचलो होते. धुळे, जळगाव, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, अमरावती, भंडारा, गडचिरोली, वर्धा, वाशीम येथे तापमानाचा पारा ३७ अंशांच्या पार होता. कमाल तापमानातील वाढीने उन्हाच्या झळा वाढल्या आहेत.

किमान तापमानात सातत्याने वाढ होत असून, रविवारी (ता. ९) निफाड येथील गहू संशोधन केंद्रात १२.६ अंशांची नोंद झाली. राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात तब्बल १४ ते २४ अंशांपर्यंत तफावत होती.

आज (ता. १०) कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत उष्णतेची लाट येण्याचा, तर सिंधुदुर्गात हवामान सरासरीपेक्षा उष्ण व दमट राहणार असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात कमाल आणि किमान तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

रविवारी (ता. ९) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

ठिकाणे---कमाल---किमान

पुणे---३८.०---१४.७

अहिल्यानगर---निरंक---१३.५

धुळे---३७.५---१३.८

जळगाव---३७.५---१५.०

जेऊर---३८.५---१५.५

कोल्हापूर---३७.५---२०.७

महाबळेश्वर---३२.८---१८.९

मालेगाव---३५.८---१६.२

नाशिक---३६.७---१४.३

निफाड---३६.५---१२.६

सांगली---३८.५---१९.७

सातारा---३८.२---१७.४

सोलापूर---३९.१---१९.२

सांताक्रूझ---३५.४---२०.१

डहाणू---३५.२---१९.३

रत्नागिरी---३३.५---२१.०

छत्रपती संभाजीनगर---३७.०---१८.०

धाराशिव---निरंक---१६.८

परभणी---३७.९---१८.०

परभणी (कृषी)---३७.१---१३.५

अकोला---३९.०---१८.२

अमरावती---३७.४---२१.३

भंडारा---३७.०---१९.०

बुलडाणा---३५.८---२०.५

ब्रह्मपुरी---३८.७---१५.४

चंद्रपूर---३८.०---निरंक

गडचिरोली---३७.४---१५.४

गोंदिया---३५.२---१६.६

नागपूर---३८.०---१८.२

वर्धा---३७.२---१८.०

वाशीम---३७.६---निरंक

यवतमाळ---निरंक---१५.५

सरासरी तापमान (अंश से.)

विभाग---किमान---कमाल

विदर्भ---१५.४---३९.०

मराठवाडा---१३.५---३७.९

पश्‍चिम महाराष्ट्र---१४.७---३९.१

उत्तर महाराष्ट्र---१२.६---३७.५

कोकण---१९.३---३५.४

उष्ण लाटेचा इशारा (येलो अलर्ट) :

पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी.

उष्ण व दमट हवामानाचा इशारा (येलो अलर्ट) : सिंधुदुर्ग.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीन दरात चढ-उतार, गवार भावात घसरण, पालक आवकेत घट, वांगी दरात चढ-उतार तर डाळिंब दरात बदल

NCC Colonel Commandant Degree: कुलगुरू डॉ. शरद गडाख यांना मानद ‘कर्नल कमांडंट’ पदवी

Analog Paneer Ban: राज्यात कृत्रिम (एनालॉग) पनीरवर वर्षभराची बंदी

Water Conservation: श्रमदानातून पाणीदार झाले ‘सालईबन’

Maharashtra Rain Update: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा; मराठवाड्यात हलक्या सरी शक्य

SCROLL FOR NEXT