हवामान

Heat Wave : विदर्भात उष्ण लाटेचा इशारा कायम

Monsoon Update : मॉन्सूनचे लांबलेले आगमन, पूर्वमोसमी पावसाची दडी यामुळे राज्यात उन्हाचा चटका चांगलाच तापदायक ठरत आहे. विदर्भात आलेली उष्णतेची लाट कायम आहे.

Team Agrowon

Weather Update Pune : मॉन्सूनचे लांबलेले आगमन, पूर्वमोसमी पावसाची दडी यामुळे राज्यात उन्हाचा चटका चांगलाच तापदायक ठरत आहे. विदर्भात आलेली उष्णतेची लाट कायम आहे. आज (ता. १८) विदर्भात उष्ण लाट (येलो अलर्ट) ते तीव्र उष्ण लाटेचा (ऑरेंज अलर्ट) इशारा आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता विभागाने वर्तविली आहे.

राज्याच्या कमाल तापमानातील वाढ कायम असून, शनिवारी (ता. १७) सकाळपर्यंतच्या २४ तासांत विदर्भातील चंद्रपूर येथे उच्चांकी ४२.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. ब्रह्मपूरी, गडचिरोली, गोंदिया येथे तापमान ४२ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक आहे. उर्वरित राज्यात तापमान ३३ ते ४१ अंशाच्या दरम्यान आहे. राज्यात जोरदार वारे वाहत असून, अंशतः ढगाळ हवामान होत आहे. तुरळक ठिकाण हलक्या सरींनी हजेरी लावली आहे.

कमाल तापमानाचा पारा चाळिशीपार असल्याने तसेच सरासरीच्या तुलनेत ४.५ ते ६.५ अंशांपेक्षा अधिक वाढ झाल्याने विदर्भात उष्ण ते तीव्र उष्ण लाट कायम आहे. विदर्भातील उष्ण ते तीव्र उष्ण लाट आज (ता. १८) कायम राहण्याची शक्यता आहे.

तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी, विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह वादळी पावसाचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.

चक्रीवादळ निवळले

'बिपॉरजॉय' चक्रीवादळ गुरूवारी (ता. १५) मध्यरात्री गुजरातच्या किनाऱ्याला धडकले. जमीनीवर येताच वादळाची तीव्रता ओसरली आहे. नैर्ऋत्य राजस्थान आणि लगतच्या गुजरातमध्ये वादळी प्रणाली (डीप डिप्रेशन) कायम आहे. ईशान्येकडे सरकत असलेली ही प्रणाली आज (ता. १८) आणखी निवळणार आहे.

मॉन्सूनची प्रगती नाही

तळ कोकणात, दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या काही भागात दाखल झालेल्या मॉन्सूनने सोमवारी (ता. १२) दक्षिण भारताच्या काही भागासह, संपूर्ण पूर्वोत्तर राज्ये आणि सिक्कीमसह, पश्चिम बंगाल, बिहारच्या काही भागात प्रगती केली. त्यानंतर मॉन्सूनची प्रगती झालेली नाही. उद्या (ता. १९) ते बुधवार (ता. २१) दरम्यान दक्षिण द्वीपकल्प आणि पूर्व भारताच्या आणखी काही भागात मॉन्सूनची प्रगती होण्याचा अंदाज आहे.

शनिवारी (ता. १७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३३.८ (२४.७), जळगाव ४०.५ (२७.५), धुळे ४०.० (२४.०), कोल्हापूर ३१.१ (२४.३), महाबळेश्वर २१.६ (१८.५), नाशिक ३३.३ (२५.३),

निफाड ३३.४ (२६.३), सांगली ३३.७ (२३.६), सातारा ३२.२ (२४.८), सोलापूर ३८.२ (२३.८), सांताक्रूझ ३२.८ (२८.०), डहाणू ३३.५ (२८.०), रत्नागिरी ३२.६ (२६.४),

छत्रपती संभाजीनगर ३६.० (२३.६), नांदेड ४०.२ (२७.६), परभणी ३९.८ (२६.२), अकोला ४१.३ (२८.८), अमरावती ४१.६(२७.०), बुलढाणा ३९.० (२५.०), ब्रह्मपूरी ४२.४ (३०.०),

चंद्रपूर ४२.६(३०.२), गडचिरोली ४२.४ (२८.६), गोंदिया ४२.० (२८.२), नागपूर ४१.८ (२८.४), वर्धा ४१.९(३०.५), वाशीम ४०.६(२५.८) यवतमाळ ४०.७ (२६.५).

उष्ण लाटेचा इशारा :

बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

वादळी पावसाचा इशारा :

परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव, लातूर, नांदेड, सोलापूर, सांगली

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT