Latest Weather Update : मॉन्सूनचे लांबलेले आगमन, पूर्वमोसमी पावसाची दडी यामुळे राज्यात पावसाची प्रतीक्षा कायम आहे. विदर्भात उष्णतेची लाट कायम असून, आज (ता. २०) विदर्भात उष्ण लाटेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे.
राज्याच्या कमाल तापमानातील चढ-उतार सुरूच असून, सोमवारी (ता. १९) सकाळपर्यंतच्या २४ तासांत विदर्भातील चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी ४२.४ अंश सेल्सिअस, तर गडचिरोली येथे ४२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यात तापमान ३२ ते ४१ अंशाच्या दरम्यान आहे. राज्यात जोरदार वारे वाहत असून, ढगाळ हवामान होत आहे.
कमाल तापमानाचा पारा चाळिशीपार असल्याने तसेच सरासरीच्या तुलनेत ४.५ अंशांपेक्षा अधिक वाढ झाल्याने विदर्भात उष्ण लाट कायम आहे. विदर्भातील उष्ण लाट आज (ता. २०) कायम राहण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.\
सोमवारी (ता. १९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :
पुणे ३४.१ (२३.९), जळगाव ३९ (२७), धुळे ३९ (२३.२), कोल्हापूर ३२.७ (२३.८), महाबळेश्वर (१८.१), नाशिक ३२.९ (२३.९),
निफाड ३४.५ (२५), सांगली ३४.९ (२३.७), सातारा ३३.३ (२३.४), सोलापूर ३८.४ (२४.८), सांताक्रूझ ३२.६ (२८.१), डहाणू ३५.३ (२८.५), रत्नागिरी ३२.६ (२८.१),
छत्रपती संभाजीनगर ३६ (२२.६), नांदेड ३९.८ (२८.०), परभणी ३८.१ (२६.९), अकोला ४०.१ (२८.४), अमरावती ३९.८(२६.३), बुलढाणा ३८ (२५), ब्रह्मपूरी ४१.८ (३०.४),
चंद्रपूर ४२.४ (३०.४), गडचिरोली ४२ (२८.८), गोंदिया ४०.८ (२८.६), नागपूर ४०.३ (२८.६), वर्धा ४० (२९.५), वाशीम ४१ (२४.६) यवतमाळ ३९.५ (२६).
उष्ण लाटेचा इशारा :
अमरावती, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.