Heat Wave  Agrowon
हवामान

Heat Wave : मध्य महाराष्ट्र, विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Summer Heat : कमाल तापमानात वाढ झाल्याने उन्हाचा चटका तापदायक ठरत आहे. आज (ता. ३) मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात उष्ण लाटेचा इशारा आहे.

Team Agrowon

Weather Update Pune : कमाल तापमानात वाढ झाल्याने उन्हाचा चटका तापदायक ठरत आहे. आज (ता. ३) मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात उष्ण लाटेचा इशारा आहे. तर कोकण, मध्य महाराष्ट्रात विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. उर्वरित राज्याच्या कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.

शुक्रवारी (ता. २) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील अकोला येथे देशातील उच्चांकी ४४.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुणे येथे पारा ४० अंशांच्या पार गेल्याने तसेच कमाल तापमानात ४.८ अंशांची वाढ झाल्याने उष्णतेची लाट आली होती.

वर्धा, अमरावती, जळगाव, ब्रह्मपूरी येथेही तापमान ४३ अंशांच्या पुढे आहे. कोकणातही उन्हाचा चटका वाढला असून, उर्वरित राज्यात अनेक ठिकाणी तापमान चाळिशीपार आहे. राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली आहे.

पूर्वमध्य बंगालच्या उपसागरात म्यानमार किनाऱ्याजवळ समुद्रसपाटीपासून ३.१ ते ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. दक्षिण ओडिशा आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत आहेत.

राज्यात उन्हाचा चटका वाढला असून, आज (ता. ३) विदर्भासह, दक्षिण मध्य महाराष्ट्रात उष्ण लाट येण्याची शक्यता आहे. राज्यात उष्ण व दमट त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्र, कोकणात विजांसह पावसाची अंदाज हवामान विभागाने वर्तविली आहे.

शुक्रवारी (ता. २) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ४०.१ (२२.७), जळगाव ४३.५ (२७.५), धुळे ४१.५ (-), कोल्हापूर ३५.६ (२४.५), महाबळेश्वर ३१.६ (१५.४), नाशिक ३९.० (२२.७),

निफाड ४०.८ (२४.१), सांगली ३८.२ (२२.८), सातारा ३९.५ (२४.०), सोलापूर ४२.२ (२६.१), सांताक्रूझ ३४.३ (२७.०), डहाणू ३४.० (२८.१), रत्नागिरी ३४.२ (२७.९),

छत्रपती संभाजीनगर ४०.६ (२५.६), नांदेड ४२.४ (२७.०), परभणी ४२.५ (२७.९), अकोला ४४.३ (३०.४), अमरावती ४३.८(२६.३), बुलढाणा ४१.० (२७.५), ब्रह्मपूरी ४३.० (२६.४),

चंद्रपूर ४२.८(२६.०), गोंदिया ४२.८ (२४.४), नागपूर ४२.५ (२४.९), वर्धा ४३.९(२८.२), वाशीम ४२.६(-) यवतमाळ ४२.५ (२५.०).

अरबी समुद्रात कमी दाब क्षेत्राचे संकेत

अरबी समुद्राच्या आग्नेय भागात सोमवारी (ता. ५) चक्रकार वाऱ्यांची स्थिती तयार होण्याची शक्यता आहे. या चक्राकार वाऱ्यांच्या प्रभावामुळे बुधवारपर्यंत (ता. ७) या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT