Heat Wave Agrowon
हवामान

Heat Wave : विदर्भात उष्ण लाट ठरतेय तापदायक

Monsoon Update : मॉन्सूनचे लांबलेले आगमन, पूर्वमोसमी पावसाची दडी यामुळे राज्यात जोरदार पावसाची प्रतिक्षा आहे.

Team Agrowon

Weather Update Pune : मॉन्सूनचे लांबलेले आगमन, पूर्वमोसमी पावसाची दडी यामुळे राज्यात जोरदार पावसाची प्रतिक्षा आहे. कमाल तापमानात चढ -उतार होत आहेत. विदर्भात आलेली उष्णतेची लाट कायम आहे. आज (ता. १९) विदर्भात उष्ण लाटेचा इशारा (येलो अलर्ट) आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह वादळी पावसाची शक्यता विभागाने वर्तविली आहे.

राज्याच्या कमाल तापमानातील चढ-उतार सुरूच असून, रविवारी (ता. १८) सकाळपर्यंतच्या २४ तासांत विदर्भातील चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी ४२.४ अंश सेल्सिअस, तर अकोला येथे ४२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यात तापमान ३२ ते ४१ अंशाच्या दरम्यान आहे. राज्यात जोरदार वारे वाहत असून, अंशतः ढगाळ हवामानासह तापमानातील चढ-उतार सुरूच राहणार आहेत.

कमाल तापमानाचा पारा चाळिशीपार असल्याने तसेच सरासरीच्या तुलनेत ४.५ ते ६.५ अंशांपेक्षा अधिक वाढ झाल्याने विदर्भात उष्ण ते तीव्र उष्ण लाट कायम आहे. विदर्भातील उष्ण लाट आज (ता. १९) कायम राहण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह वादळी पावसाचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.

राजस्थानमध्ये तीव्र कमी दाब क्षेत्र

'बिपॉरजॉय' चक्रीवादळ गुरूवारी (ता. १५) मध्यरात्री गुजरातच्या किनाऱ्याला धडकले. जमीनीवर येताच वादळाची तीव्रता ओसरत आहे. रविवारी (ता. १८) दक्षिण राजस्थान आणि परिसरावर तीव्र कमी दाबाचे क्षेत्र (डिप्रेशन) सक्रिय आहे. ईशान्येकडे सरकत असलेली ही प्रणाली आज (ता. १९) विरून जाण्याची शक्यता आहे.

दोन दिवसांत मॉन्सूनची प्रगती शक्य

तळ कोकणात, दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या काही भागात दाखल झालेल्या मॉन्सूनने गेल्या सोमवारी (ता. १२) दक्षिण भारताच्या काही भागासह, संपूर्ण पूर्वोत्तर राज्ये आणि सिक्कीमसह, पश्चिम बंगाल, बिहारच्या काही भागात प्रगती केली. त्यानंतर मॉन्सूनची वाटचाल जैसे थे आहे. पुढील दोन दिवसांत दक्षिण द्वीपकल्पासह पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड राज्याच्या काही भागात मॉन्सूनची प्रगती होण्याचा अंदाज आहे.

रविवारी (ता. १८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३३.६ (२४.८), जळगाव ४०.४ (२६.६), धुळे ३८.५ (-), कोल्हापूर ३२.६ (२४.३), महाबळेश्वर २१.८ (१८.५), नाशिक ३२.८ (२४.५),

निफाड ३३.८ (२५.२), सांगली ३५.० (२४.२), सातारा ३३.४ (२४.९), सोलापूर ३८.३ (२४.९), सांताक्रूझ ३२.८ (२८.०), डहाणू ३४.१ (२८.७), रत्नागिरी ३३.० (२६.५),

छत्रपती संभाजीनगर ३६.५ (२३.०), नांदेड ३९.६ (२७.८), परभणी ३९.० (२६.७), अकोला ४२.० (२८.५), अमरावती ४१.०(२६.१), बुलढाणा ३८.८ (२५.०), ब्रह्मपूरी ४१.९ (३०.४),

चंद्रपूर ४२.४(३०.४), गडचिरोली ४१.८ (२८.४), गोंदिया ४१.६ (२९.०), नागपूर ४१.२ (२८.२), वर्धा ४१.०(२९.९), वाशीम ४१.०(२५.८) यवतमाळ ४०.० (२६.२).

उष्ण लाटेचा इशारा :

अकोला, अमरावती, वाशिम, वर्धा.

वादळी पावसाचा इशारा :

छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, नांदेड, लातूर, नांदेड, सोलापूर, सांगली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Amravati Teachers Constituency : अमरावती शिक्षक निवडणूक: शिक्षकांच्या मतांवर कोणाचा ताबा? मतविभाजन ठरणार निर्णायक

FFS App Fertilizer Booking : खत खरेदी आता झाली डिजिटल; २२ तारखेपासून घरबसल्या करा ऑनलाईन बुकिंग

Canal Water Release : पाण्याचा प्रश्न ऐरणीवर: बंधारे भरण्यासाठी कॅनॉलमधून पाणी सोडण्याची शेतकऱ्यांची आर्त हाक

Women Farmers: आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षानिमित्त अकोल्यात महिला शेतकऱ्यांसाठी विशेष उपक्रम

Soybean Fodder Seized: कारंजा तालुक्यात २६० टन सोयाबीन कुटार जप्त; १० कारखान्यांना नोटिसा

SCROLL FOR NEXT