Hailstorm  Agrowon
हवामान

Hailstorm Forecast : विदर्भ, मराठवाड्यात उद्यापासून गारपिटीचा इशारा

Weather Update : राज्यात उन्हाचा चटका असह्य होऊ लागला आहे. चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी ४२.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

अमोल कुटे

Pune News : राज्यात उन्हाचा चटका असह्य होऊ लागला आहे. चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी ४२.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता. ६) विदर्भात उष्ण लाटेचा, तर मराठवाड्यात उष्ण रात्रीचा इशारा देण्यात आला आहे.

मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज आहे. उद्यापासून (ता. ७ ) विदर्भ, मराठवाड्यात गारपिटीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

पूर्व विदर्भापासून, कर्नाटक, तमिळनाडू ते कोमोरिन भागापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. राज्यात सध्या ढगाळ आकाश होत असून, उन्हाच्या झळा, उकाडा कायम आहे. रात्री उष्ण ठरत असून, पावसाला पोषक हवामान होत आहे. आज (ता. ६) मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे.

शुक्रवारी (ता. ५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी ४२.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. तर सोलापूर, जेऊर, मालेगाव, यवतमाळ, अकोला, ब्रह्मपुरी, वर्धा येथे तापमानाचा पारा ४२ अंशांच्या वरच आहे. आज (ता. ६) विदर्भातील अमरावती, यवतमाळ येथे उष्ण लाटेचा, तर नांदेड येथे उष्ण रात्रीचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम राहणार आहे.

शुक्रवारी (ता. ५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३९.१, नगर ३८.२, धुळे ४०.५, जळगाव ४०.६, जेऊर ४२.०, कोल्हापूर ३९.०, महाबळेश्वर ३३.२, मालेगाव ४२.०, नाशिक ३६.८, निफाड ३६.७, सांगली ४०.८, सातारा ३९.८, सोलापूर ४२.४, सांताक्रूझ ३३.५, डहाणू ३३.९, रत्नागिरी ३३.५,

छत्रपती संभाजीनगर ३८.६, बीड ४०.३, नांदेड ४१.२, धाराशिव ४१.२, परभणी ४१.७, अकोला ४२.०, अमरावती ४१.४, बुलडाणा ३७.६, ब्रह्मपुरी ४२.०, चंद्रपूर ४२.६, गडचिरोली ४१.०, गोंदिया ४०.५, नागपूर ४१.३, वर्धा ४२.०, वाशीम ४१.४, यवतमाळ ४२.२.

- उष्ण लाटेचा इशारा (येलो अलर्ट) :

अमरावती, यवतमाळ.

- उष्ण रात्रीचा इशारा (येलो अलर्ट) :

नांदेड.

४२ अंशांपेक्षा अधिक कमाल तापमान असलेली ठिकाणे :

चंद्रपूर ४२.६, सोलापूर ४२.४, यवतमाळ ४२.२, जेऊर ४२, मालेगाव ४२, अकोला ४२, ब्रह्मपुरी ४२, वर्धा ४२.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Indian Economy : अर्थव्यवस्थेत पहिल्या तिमाहीत ७.८ टक्के वाढ; शेतीचं चित्र पावसावर अवलंबून

Plant Nutrition: अन्नद्रव्ये पिकांना कशी मिळतात?

Chickens Breeding Management: ब्रीडर कोंबड्यांचे प्रजनन व्यवस्थापन

Tribal Farmer Relief: वनपट्टेधारक आदिवासी शेतकऱ्यांनाही मिळणार कर्जमाफी, महसूलमंत्री बावनकुळेंची माहिती

Chakan Livestock Market: नावारूपाला आलेला चाकणचा जनावरांचा बाजार

SCROLL FOR NEXT