Hailstorm Agrowon
हवामान

Hailstorm Alert : मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात आज गारपिटीचा इशारा

मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपिटीसह पावसाचा, विदर्भाच्या काही भागांत वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

Team Agrowon

Weather Update Pune सूर्य तळपू लागल्याने तापमान (Temperature) चाळिशीपार गेले आहे. राज्यात उन्हाच्या झळा असह्य होत असतानाच उकाड्यातही वाढ झाली आहे.

यातच आजपासून (ता. ७) राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज (Stormy Rain Forecast) आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपिटीसह पावसाचा (Hailstorm Alert), विदर्भाच्या काही भागांत वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने (Weather Department) दिला आहे.

राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार सुरूच आहेत. गुरुवारी (ता. ६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला येथे राज्यातील उच्चांकी ४०.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

तर सोलापूर, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, वर्धा येथे तापमान ४० अंशांच्या वर गेले आहे. कोकण वगळता उर्वरित राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान ३५ ते ३९ अंशांच्या दरम्यान होते. तर किमान तापमानाचा पारा १५ ते २७ अंशांच्या दरम्यान होता.

उत्तर कर्नाटक आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. उत्तर अंतर्गत कर्नाटकपासून दक्षिण तमिळनाडूपर्यंत समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर खंडित वाऱ्यांची स्थिती सक्रिय आहे. दक्षिण राजस्थान आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे.

गुरुवारी (ता. ६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३६.८ (१७.५), जळगाव ३८.५ (२०), धुळे ३८ (१७), कोल्हापूर ३६.७ (२२.७), महाबळेश्‍वर ३१.५ (१८.१), नाशिक ३५.२ (१९.३),

निफाड ३५.५ (१५.१), सांगली ३७.६ (२३.५), सातारा ३६.२ (२१.३), सोलापूर ४०.३ (२५.१), सांताक्रूझ ३२ (२२.८), डहाणू ३२.६ (२२.६), रत्नागिरी ३२.३ (२२.५),

छत्रपती संभाजीनगर ३७.२ (२०.४), नांदेड ३८ (२४.२), परभणी ३९.१ (२४.१), अकोला ४०.४ (२२.८), अमरावती ३८.८ (२३), बुलडाणा ३८ (२४), ब्रह्मपुरी ४०.२ (२४.४),

चंद्रपूर ४०.२ (२५.४), गडचिरोली ३५.८ (२०.४), गोंदिया ३८.२ (२२.८), नागपूर ३८.६ (२३.५), वर्धा ४० (२६.८), वाशीम - (२०), यवतमाळ ३८.७ (२४.७).

वादळी पाऊस, गारपिटीचा इशारा (ऑरेंज अलर्ट)

सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड.

वादळी पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :

वाशीम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली.

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Heavy Rain: घाटमाथ्यावर जोरदार सरी

Maharashtra Rain Alert: राज्यात पावसाचा जोर वाढणार; कोकण, घाटमाथ्यावर ‘ऑरेंज अलर्ट’

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

SCROLL FOR NEXT