Hailstorm Agrowon
हवामान

Hailstorm Alert: उत्तर महाराष्ट्रात गारपिटीचा इशारा

Maharashtra Weather: राज्यात ढगाळ हवामानामुळे वाऱ्यांचा वेग वाढला असून, उत्तर महाराष्ट्रात गारपिटीसह वादळी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नंदूरबार येथे देशातील सर्वाधिक ४३.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

अमोल कुटे

Pune News: राज्यात वादळी पावसाला पोषक हवामान झाल्याने किमान तापमानात घट झाली आहे. आज (ता. ६) उत्तर महाराष्ट्रात वादळी पाऊस आणि गारपिटीचा अंदाज आहे. तसेच कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. कमाल तापमानातही चढ-उतार होण्याची शक्यता आहे.

‎मध्य प्रदेशापासून मराठवाडा, तेलंगण ते दक्षिण कर्नाटकपर्यंत हवेचा दक्षिणोत्तर कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. उत्तर महाराष्ट्रातील नंदूरबार येथे देशातील उच्चांकी ४३.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात असलेल्या पावसाळी वातावरण आणि ढगाळ हवामानामुळे कमाल तापमानात चढ-उतार सुरूच आहेत. नागपूर, चंद्रपूर, गोंदिया जिल्ह्यांत वादळी पाऊस आणि गारपिटीने हजेरी लावली. यातच सोमवारी (ता. ५) जालना, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक जिल्ह्यात दुपारनंतर वादळी पाऊस आणि गारपिटीला सुरुवात झाली होती.

‎‎सोमवारी (ता. ५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नंदूरबार पाठोपाठ ‎‎‎‎वाशीम आणि मालेगाव येथे ४२ अंशांपेक्षा अधिक, ‎परभणी आणि अकोला येथे ४१ अंशांपेक्षा अधिक तापमान नोंदले गेले. ‎‎धुळे, जेऊर, ‎सोलापूर, ‎धाराशिव, ‎ब्रह्मपुरी, ‎चंद्रपूर ४०.८, गडचिरोली, ‎यवतमाळ येथे ४० अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली.

आज (ता. ६) राज्यात अंशतः ढगाळ आकाशासह वादळी पावसाची शक्यता आहे. नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक येथे जोरदार वादळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता आहे. तसेच कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर, पुणे, सातारा, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, विदर्भातील अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा ( येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

‎सोमवारी (ता. ५) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

‎ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

‎पुणे---३६.९---२१.७

‎‎धुळे---४०.०---१९.५

‎जळगाव---३९.०---२६.०

‎जेऊर---४०.५---२०.०

‎कोल्हापूर---३६.२---२१.७

‎महाबळेश्वर---३०.७---१८.२

‎मालेगाव---४२.४---२४.८

‎नाशिक---३५.७---२२.३

‎निफाड---३७.४---२१.०

‎सांगली---३७.९---२२.०

‎सातारा---३७.७---२०.६

‎सोलापूर---४०.६---२६.२

‎सांताक्रूझ---३३.७---२६.६

डहाणू---३५.८---२६.०

‎रत्नागिरी---३४.२---२५.१

‎छत्रपती संभाजीनगर---३९.०---२४.०

‎धाराशिव---४०.८---२२.८

‎परभणी---४१.७---२६.५

‎परभणी (कृषी)---३९.९---२४.०

‎अकोला---४१.६---२५.३

अमरावती---३७.६---२८.०

‎‎भंडारा---३७.६---२०.०

बुलडाणा---३९.०---२४.६

‎ब्रह्मपुरी---४०.०---२१.४

‎चंद्रपूर---४०.८---निरंक

‎गडचिरोली---४०.२---२१.४

गोंदिया---३७.१---२०.२

‎नागपूर---३९.९---२०.०

‎वर्धा---३९.९---२०.०

‎वाशीम---४२.८---निरंक

‎यवतमाळ---४०.०---२१.६

सरासरी तापमान (अंश से.)

‎विभाग---किमान---कमाल

‎विदर्भ---२०.०---४२.८

‎मराठवाडा---२२.८---४१.७

‎पश्‍चिम महाराष्ट्र---१८.२---४०.६

‎उत्तर महाराष्ट्र---१९.५---४३.२

‎कोकण---२५.१---३५.८

वादळी पाऊस, गारपिटीची शक्यता (येलो अलर्ट)

नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक.

वादळी पावसाची शक्यता (येलो अलर्ट)

पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, अहिल्यानगर, पुणे, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली.

‎४१ अंशापेक्षा अधिक तापमान असलेली ठिकाणे

‎वाशीम ४२.८, मालेगाव ४२.४, ‎परभणी ४१.७, अकोला ४१.६.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Harbhara Tur Kharedi: हरभरा-तूर खरेदीला मुदतवाढ; मेअखेरपर्यंत दिलासा

Jintur Water Shortage: जिंतूर तालुक्यातील ३ गावांना ५ टँकरद्वारे पाणीपुरवठा

Yeola Acid Attack Case: ‘पोलिस मित्र’च निघाला शेतकऱ्यावरील अ‍ॅसिड हल्ल्याचा सूत्रधार

Parbhani Crop Insurance: परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण विमा परतावा द्या: कृषिमंत्री भरणे

Sustainable Farming: शेतकऱ्यांनी शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करावा

SCROLL FOR NEXT