Monsoon Agrowon
हवामान

Monsoon Update: खूशखबर; माॅन्सून ५ दिवसांत केरळमध्ये येणार

Monsoon Forecast: देशभरात मॉन्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे की मॉन्सून पुढील ४-५ दिवसांत केरळमध्ये दाखल होईल, तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Anil Jadhao 

Pune News: माॅन्सून पुढील ४ ते ५ दिवसांत केळमध्ये दाखल होण्याचा अंदाज आहे. माॅन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान असल्याने माॅन्सून यंदा लवकरच देशात प्रवेश करेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला. दुसरीकडे राज्यातील काही भागात पुढील ५ दिवस वादळी पावसाचा शक्यता असून आज ९ जिल्ह्यांना वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला.

माॅन्सूच्या वाटचालीसाठी पोषक हवामान आहे. त्यामुळे पुढील ४ ते ५ दिवसांमध्ये माॅन्सून केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाने दिला. माॅन्सून या ४ ते ५ दिवसांमध्ये दक्षिण अरबी समुद्राचा आणखी काही भाग, लक्षद्वीपचा काही भाग, केरळ आणि तमिळनाडूचा काही भाग, बंगाल उपसागराचा काही भाग आणि ईशान्यकडील राज्यांचा काही भाग तसेच मालदीव आणि कोमोरिनचा उरलेला भाग माॅन्सून व्यापेल, असाही अंदाज हवामान विभागाने दिला.

माॅन्सूनने काल पर्यंत श्रीलंकेचा बहुतांशी भाग व्यापला होता. तसेच दक्षिण अरबी समुद्राच्या आणखी काही भागात चाल केली होती. मालदीव आणि कोमोरिनच्या आणि बंगाल उपसागराच्या काही भागातही माॅन्सूनने प्रगती केली होती. मात्र आज माॅन्सून कालच्या जागेवर होता.

पूर्व-मध्य अरबी समुद्रात कर्नाटकच्या किनाऱ्यालगत बुधवारी चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार होण्याची शक्यता आहे. या वाऱ्यांच्या प्रभावामुळे गुरुवारी या भागात कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचे संकेत आहेत. त्यानंतर ही स्थिती उत्तरेकडे सरकताना तीव्रता वाढण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

राज्यात वादळी पावसाला पोषक हवामान आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पुढील ५ दिवस काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज आहे. तर विदर्भात दोन ते चार दिवस पावसाची शक्यता वर्तविण्यात आली. अकोला, अमरावती, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात पुढील ४ दिवस वादळी पावसाचा अंदाज आहे. तर भंडारा, नागपूर, वाशीम, गडचिरोली, गोंदीया, वर्धा जिल्ह्यात आज आणि उद्या पावसाचा अंदाज आहे.

हवामान विभागाने आज ९ जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला. सिंधुदूर्ग, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, लातूर, धाराशिव जिल्ह्यात आज वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला. मराठवाड्यातील छत्रतपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, लातूर, नांदेड, धाराशीव आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी पुढील ५ दिवस वादळी पावसाचा अंदाज आहे.

खानदेशातील जळगाव, धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यातही पुढील ५ दिवस पावसाचा अंदाज आहे. तर मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यागर आणि नाशिक जिल्ह्यातही काही ठिकाणी पुढील ५ दिवस वादळी पावसाचा अंदाज आहे. कोकणातही सर्वच जिल्ह्यांमध्ये पुढील ५ दिवस काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT