Maharashtra Rain Agrowon
हवामान

Maharashtra Rain : कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी पावसाचा अंदाज

Maharashtra Monsoon Update : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) देशाचा निरोप घेतला असला, तरी राज्यात वादळी पावसाचा तडाखा कायम आहे.

अमोल कुटे

Pune News : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) देशाचा निरोप घेतला असला, तरी राज्यात वादळी पावसाचा तडाखा कायम आहे. आज (ता. १७) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी वारे, विजांसह पावसाच्या सरींची कोसळण्याची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) कायम आहे. विदर्भासह उर्वरित महाराष्ट्रात हलक्या पावसासह उन्हाचा चटका कमी-अधिक होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

राज्यातील पावसाने कमाल तापमानात घट झाली आहे. विदर्भात उन्हाचा चटका तापदायक ठरत आहे. बुधवारी (ता. १६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला येथे राज्यातील उच्चांकी ३६.५ अंश तापमानाची नोंद झाली. ब्रह्मपुरी येथे ३६.२ अंश, तसेच अमरावती, चंद्रपूर येथे ३५ अंशांपेक्षा अधिक तापमान नोंदले गेले. ढगाळ हवामानामुळे तापमानात चढ-उतार शक्य आहे.

पावसाला पोषक हवामान असल्याने आज (ता. १७) कोकणातील सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर येथे जोरदार वादळी पावसाचा इशारा आहे. तर पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, नगर, पुणे, सांगली, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर वादळी वारे, विजांसह, पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) कायम आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

बुधवारी (ता. १६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

पुणे ३२.८, जळगाव ३३.८, कोल्हापूर २९.१, महाबळेश्‍वर २५.९, नाशिक ३२.३, निफाड ३२.५, सांगली २९.५, सातारा ३०.५, सोलापूर ३३.४, सांताक्रूझ ३२.७, डहाणू ३३.३, रत्नागिरी ३१.६, छत्रपती संभाजीनगर ३३.२, परभणी ३२.६, अकोला ३६.५, अमरावती ३५.६, भंडारा ३२, बुलडाणा ३२.०, ब्रह्मपुरी ३६.२, चंद्रपूर ३५.४, गडचिरोली ३३, गोंदिया ३३.८, नागपूर ३४.६, वर्धा ३४, वाशीम ३४.२, यवतमाळ ३३.५.

तीव्र कमी दाब क्षेत्र आज धडकणार

बंगालच्या उपसागरात तीव्र कमी क्षेत्र (डिप्रेशन) किनाऱ्याकडे झेपावत आहे. बुधवारी (ता. १६) ही प्रणाली चेन्नईपासून ३२० किलोमीटर, पद्दुचेरीपासून ३५० किलोमीटर पूर्वेकडे, तर नेल्लोरपासून ४०० किलोमीटर आग्नेयेकडे होती. आज (ता. १७) हे कमी दाबाचे क्षेत्र पद्दुचेरी आणि नेल्लोरजवळ किनाऱ्याला धडकून जमिनीवर येण्याची शक्यता आहे.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर.

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, नगर, पुणे, सांगली, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर.

सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर.

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, नगर, पुणे, सांगली, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT