Weather Update
Weather Update Agrowon
हवामान

Weather Update : विदर्भात पाऊस, गारपिटीचा इशारा

Team Agrowon

Weather Update Pune भर उन्हाळ्यात राज्याच्या विविध भागात वादळी वारे, पाऊस, गारपिटीने (Hailstorm) हजेरी लावल्याने कमाल तापमानात चढ-उतार सुरू आहे. आज (ता. ३०) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता (Rain Forecast) आहे.

विदर्भात वादळी वारे, जोरदार पाऊस, गारपिटीचा 'ऑरेंज अलर्ट' कायम आहे. कमाल तापमानातील चढ-उतार कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने (Weather Department) वर्तविली आहे.

पावसाची हजेरी, ढगाळ हवामान यामुळे राज्याच्या कमाल तापमानात घट झाली आहे. तापमानाचा पारा ३८ अंशांच्या खाली घसरला आहे. मात्र उन्हाचा चटका आणि उकाडा कायम आहे.

शनिवारी (ता. २९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये जळगाव येथे राज्यातील उच्चांकी ३७.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान ३२ ते ३७ अंशांच्या दरम्यान आहे. कमाल तापमानात चढ-उतार कायम राहण्याची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्र, कर्नाटक किनारपट्टी, अरबी समुद्र ते मालदीव पर्यंत समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा व खंडीत वाऱ्यांची स्थिती कायम आहे.

आज (ता. ३०) विदर्भातील वाशीम, यवतमाळ जिल्ह्यात गारपीट आणि जोरदार पावसाचा 'ऑरेंज अलर्ट' आहे. महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यासह, वादळी पावसाचा इशारा कायम आहे.

शनिवारी (ता. २९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३५.२ (२२.०), जळगाव ३७.७ (२०.०), कोल्हापूर ३४.६ (२३.३), महाबळेश्वर २६.९ (१७.९), नाशिक ३५.४(१९.९),

निफाड ३८.२ (२०.८), सांगली ३५.४ (२३.९), सातारा ३२.८ (२३.९), सोलापूर ३६.० (२०.०), सांताक्रूझ ३२.४ (२५.०), डहाणू ३२.६ (२४.८), रत्नागिरी ३३.३ (२४.१),

छत्रपती संभाजीनगर ३२.६ (१५.७), नांदेड - (२१.८), धाराशिव ३६.० (१८.०), परभणी ३४.१ (२१.०), अकोला ३६.७ (१९.६),

अमरावती ३६.४(१९.१), बुलढाणा ३३.२ (१८.५), ब्रह्मपूरी ३४.६ (२०.१), गडचिरोली ३३.२(२१.४), गोंदिया ३५.२ (२१.४), नागपूर ३४.२ (२०.४), वर्धा ३५.२(२१.४), यवतमाळ ३४.० (२०.०).

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

मध्य महाराष्ट्र, : नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, सोलापूर.

मराठवाडा : बीड, परभणी, नांदेड, धाराशिव, लातूर.

विदर्भ : बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

SCROLL FOR NEXT