Weather Update Agrowon
हवामान

Maharashtra Rain Update : राज्यात हलक्या पावसाचा अंदाज कायम

Latest Rain Update : पावसाची दडीने राज्यात उन्हाच्या झळा तापदायक ठरत आहेत. ढगाळ हवामानामुळे उकाड्यातही वाढ झाली आहे.

Team Agrowon

Weather Update Pune : पावसाची दडीने राज्यात उन्हाच्या झळा तापदायक ठरत आहेत. ढगाळ हवामानामुळे उकाड्यातही वाढ झाली आहे. आज (ता. १) राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. पावसात मोठा खंड पडल्याने अनेक भागात पावसाची प्रतिक्षा कायम आहे.

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा हिमालयाच्या पायथ्याकडे टिकून आहे. ईशान्य बंगालच्या उपसागरात समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर, आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत ९०० मीटर उंचीवर, पूर्व उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये ३.१ ते ४.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांच्या स्थिती आहेत.

राज्यात पावसाने उघडीप दिली असून, कमाल तापमानात वाढ झाली आहे. दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे तापदायक ठरत आहे. दुपारनंतर ढगाळ हवामान होत असून, ऐन पावसाळ्यात उन्हाच्या झळा वाढल्याने चांगलाच घामटा निघत आहे.

आज (ता. १) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात मुख्यतः उघडिप राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Hingoli Crop Loan : हिंगोली जिल्ह्यात पीककर्ज वाटपाचे ३५.१६ टक्के उद्दिष्ट साध्य

Rabi Season : पाच लाख ५४ हजार हेक्टरवर रब्बीत पेरणीचे कृषी विभागाकडून नियोजन

District Co-operative Bank : जिल्हा बँकेवर प्रशासक नियुक्तीच्या हालचाली

Amravati Rain Deficit : अमरावती जिल्ह्यात २२ दिवसांपासून पावसाचा खंड

Crop Damage Panchnama: पिकांवर रोटाव्हेटर फिरवू नका, नुकसानीच्या पंचनाम्यासाठी पुरावे राहतील, सहकारमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आवाहन

SCROLL FOR NEXT