Rain Agrowon
हवामान

Maharashtra Rain Alert : राज्यात पावसाचे वाढण्याचा अंदाज; मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज

Maharashtra Rain Update : राज्यातील काही भागात पुढील ४ दिवस हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

Anil Jadhao 

Pune News : राज्याच्या काही भागात मागील तीन दिवसांपासून हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडत आहेत. तर दक्षिण भारतात ईशान्य माॅन्सून सक्रिय झाल्याने काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. तसेच राज्यातील काही भागात पुढील ४ दिवस हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

दक्षिण भारतात ईशान्य माॅन्सून सक्रिय झाल्याने तमिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश आणि तेलंगणात पाऊस पडत आहे. हवामान विभागाने पुढील तीन दिवस या राज्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे. तसेच राज्यातही काही भागात पावसाला पोषक हवामान आहे. त्यामुळे राज्यातील काही ठिकाणी पुढील ४ दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

हवामान विभागाने पालघर वगळता कोकणातील सर्व जिल्हे आणि मध्य महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांना काही ठिकाणी विजांसह हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट दिला. तर मराठवाड्यातील बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली तर भंडारा आणि गोंदीया वगळता विदर्भातील सर्वच जिल्ह्यांनाही काही ठिकाणी विजांसह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला. तर इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाजही देण्यात आला.

उद्या कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांना काही भागात विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, नांदेड, हिंगोली आणि परभणी तसेच विदर्भातील बुलडाणा, अकोला, अवरावती, वाशीम, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाजही हवामान विभागाने दिला.

रविवारी आणि सोमवारीही कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. तर मंगळवारी दक्षिण मध्य महाराष्ट्र, दक्षिण मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT