Summer Heat Agrowon
हवामान

Weather Update : तापमानात चढ-उतार, चटका कायम

Temperature Rises :राज्याच्या तापमानात चढ-उतार होत आहे. बहुतांश ठिकाणी पारा चाळीशीच्या खाली घसरला असला, तरी उन्हाचा चटका मात्र कायम आहे.

Team Agrowon

Weather Update Pune राज्याच्या तापमानात (Temperature) चढ-उतार होत आहे. बहुतांश ठिकाणी पारा चाळीशीच्या खाली घसरला असला, तरी उन्हाचा चटका मात्र कायम आहे. राज्यात तुरळक ठिकाणी वादळी पाऊस, गारपिटीने (Hailstorm) हजेरी लावली आहे.

आज (ता. २३) विदर्भात वादळी पावसाचा इशारा (Rain Forecast) कायम आहे. उद्यापासून (ता. २४) मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

राज्यात उन्हाच्या झळा वाढूल्यानंतर शनिवारी (ता. २२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कमाल तापमानात घट झाली होती.

विदर्भात ४३ अंशांपर्यंत पोचलेले तापमान ४० अंशांच्या खाली घसरले होते. सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ४० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरीत राज्यात कमाल तापमान ३५ ते ४० अंशांच्या दरम्यान आहे.

उन्हाचा चटका आणि उकाडा कायम आहे. मराठवाड्यातील माहूर आणि किनवट तालुक्यात, यवतमाळ जिल्ह्यातील पूसद, महागाव तालुक्यांत गारपीट झाली.

वायव्य मध्य प्रदेश आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय आहे.

मध्य प्रदेशापासून, महाराष्ट्र, कर्नाटक ते दक्षिण तामिळनाडूपर्यंत समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा व खंडीत वाऱ्यांची स्थिती कायम आहे. आज (ता. २३) विदर्भात वादळी पावसाचा इशारा आहे.

तर उद्यापासून (ता. २४) मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता आहे.

शनिवारी (ता. २२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३६.७ (१६.७), जळगाव ३९.० (२३.३), कोल्हापूर ३६.६ (२२.१), महाबळेश्वर ३०.५ (१६.१), नाशिक ३५.८(१८.४),

निफाड ३७.२(१५.५), सांगली ३७.५ (२१.४), सातारा ३६.६ (१९.०), सोलापूर ४०.० (२३.९), सांताक्रूझ ३२.५ (२५.६), डहाणू ३१.९ (२४.०), रत्नागिरी ३३.५ (३३.५),

छत्रपती संभाजीनगर ३६.५ (१९.७), नांदेड ३७.८ (२३.६), परभणी ३७.७ (२२.०), अकोला ३८.२ (२३.०), अमरावती ३७.६(२१.७), बुलढाणा ३५.४ (२३.२), ब्रह्मपूरी ३८.६ (२३.४),

चंद्रपूर ३७.० (२२.०), गडचिरोली ३७.६(२१.०), गोंदिया ३९.५ (२२.६), नागपूर ३६.९ (२१.४), वर्धा ३७.५(२२.९), वाशीम ३८.२ (-), यवतमाळ ३८.२ (२१.०).

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

विदर्भ : बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Biological Crop Disease Management: जैविक पद्धतीने भुरी नियंत्रण यशस्वी करण्याच्या उपाययोजना

Organic Farming Success Story: सेंद्रिय, स्वावलंबी शेती पध्दतीचे साकारले मॉडेल

Artificial Intelligence: ‘एआय’ उडविणार झोप ...

India UK Trade Deal: व्यापार कराराचे फलित

Waste Management: कचऱ्याच्या ढिगाखाली गाडलेली व्यवस्था

SCROLL FOR NEXT